जाहिरात-9423439946
आरोग्य

अकाली मृत्यूतांडव थांबविण्यासाठी टाळेबंदीची गरज

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी मोठी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९७ टक्के आहे.मात्र तो आगामी काळात वाढण्याची शक्यता असल्याने आता कोरोना साथीचे अकाली मृत्यूतांडव थांबविण्यासाठी जनता टाळेबंदीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

सरकार आता सक्तीची टाळेबंदी करण्याच्या मानसिकतेत नाही.शहरात दैनंदिन व्यवहार बंद करण्याची अनेकांची मानसिकता नाही.अनेक जण भीतीपोटी कोरोनाची माहिती दडवत आहे.वास्तविक या साथीची माहिती दडवणे योग्य नाही प्राथमिक अवस्थेत उपचार केले तर हा आजार सर्दी-पडसे आदी साथी सारखाच आहे.मात्र भीतीपोटी व खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक अजूनही अनेक जण माहिती लपवून ठेवत आहे हि बाब दुर्दैवी आहे.तर काहींना आपल्या राजकीय पोळ्या भाजणे अग्रक्रमाचे वाटते आहे.त्यामुळे आता नागरिकांसाठी हा अत्यंत कठीण कालखंड आहे-नगराध्यक्ष वहाडणे

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सरकारने चोवीस मार्च रोजी अधिकृत टाळेबंदीची घोषणा करून आता त्याला आता पाच महिने उलटले आहेत.प्रारंभी तालुका प्रशासनाने धाक दाखवून नागरिकांना या बाबत प्रवृत्त केले त्यामुळे कोरोना येवला,वैजापूर,शिर्डी,राहाता या शहरांपेक्षा नियंत्रणात होता.१० एप्रिल रोजी शहरात लक्ष्मीनगर येथे एका महिलेचा पहिला कोरोना मृत्यू झाला होता.त्या ननंतर बरेच दिवस परिस्थिती नियंत्रणात होती.काही अधून मधून रुग्ण निघत होते मात्र नंतर साखळी तुटत होती मात्र आता सलग चाळीस-पन्नास रुग्ण निघत असून हि परिस्थिती भयावह बनत चालली आहे.आता पर्यंत चौदा नागरिकांना आपले प्राण सोडावे लागले आहे.अजून हि साथ किती बळी घेणार ? व साथ कधी थांबणार ? लस कधी येणार ? याचा काहीही थांगपत्ता नाही अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्य विभाग देईल त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असताना नागरिक बऱ्याच वेळा त्याकडे कानाडोळा करत आहे.पोलीस अधिकारी,आरोग्य विभाग,स्वछता विभाग यांच्या सुचनांकडे कानाडोळा करत आहे.सरकार आता सक्तीची टाळेबंदी करण्याच्या मानसिकतेत नाही.शहरात दैनंदिन व्यवहार बंद करण्याची अनेकांची मानसिकता नाही.अनेक जण भीतीपोटी कोरोनाची माहिती दडवत आहे.वास्तविक या साथीची माहिती दडवणे योग्य नाही प्राथमिक अवस्थेत उपचार केले तर हा आजार सर्दी-पडसे आदी साथी सारखाच आहे.मात्र भीतीपोटी व खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक अजूनही अनेक जण माहिती लपवून ठेवत आहे हि बाब दुर्दैवी आहे.तर काहींना आपल्या राजकीय पोळ्या भाजणे अग्रक्रमाचे वाटते आहे.त्यामुळे आता नागरिकांसाठी हा अत्यंत कठीण कालखंड आहे.आपण या पुर्वी अकरा ऑगष्ट रोजी बैठक घेऊन प्रयत्न करून पहिला मात्र कांहीनी त्याला हस्तेपरहस्ते विरोध केला आहे.आताही अद्याप वेळ गेलेली नाही नागरिक व व्यापाऱ्यांनी या बाबत गंभीर विचार करून तातडीने कोरोना साखळी तोडणे गरजेचे आहे.समूह संसर्गानजीक आपण पोहचलो आहोत असे म्हणण्यास जागा आहे.समूह प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास विलंब लागेल व लस मिळण्यास अद्याप खात्रीची वेळ कोणीही सांगण्यास तयार नाही.आताच नगर शहरात अंत्यविधी करण्यास दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत आहे.या नंतर अधिक गंभीर स्थिती उद्भवू शकते.आम्हा राजकारण्यांना राजकारण करण्यास आयुष्य पडले आहे.यात सामान्य नागरिकांचे व मजुरांचे पोट हातावर आहे.याची आपणाला जाणीव आहे.मात्र फार नाही तरी किमान पाच ते सहा दिवस तरी जनता टाळेबंदी जाहीर करून आपण साखळी तोडण्यास मदत केल्यास अनेक जेष्ठ नागरीकांसह तरुणांचे जीव वाचवता येऊ शकतात व अनेक कुटुंबे रस्त्यावर येण्यापासून आपण वाचवू शकतो.त्यामुळे आपल्यावर कोणी टीका केली तरी हरकत नाही पण नागरिकांचे जीवित महत्वाचे म्हणून नागरिकांनी जनता टाळेबंदीला उशीर करू नये हे उत्तम असे आवाहनही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close