जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोनाने धारणगांवच्या तरुणाचा हकनाक बळी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढता वाढे च्या गतीने वाढत असून आज शहर व तालुक्यात चाळीस रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या आता ६८५ इतकी विक्रमी झाली आहे.तर वर्तमानात सक्रिय रुग्ण १७९ असून आज धारणगाव येथील रुग्ण दीपक शंकर रणशूर (वय-३५) यांचे निधन झल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे.अर्थात या रुग्णाने ब्राम्हणगाव येथील कोरोना बाधित रुग्णास भेट दिल्याची व अंत्यविधिस हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून लागण होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यास आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याची चर्चा धारणगाव व परिसरात सुरु आहे.

हा तरुण आपल्या एका पुणे येथून ब्राम्हणगावात आलेल्या मात्र बाधित असलेल्या नातलगांना भेटण्यास गेला होता.व सदर नातेवाईक कोरोना विषाणूने निधन झाल्यावरही त्यांच्या अंत्यविधिस हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.आलेल्या विशेष म्हणजे या नातलगाने आपली माहिती दडवली होती.व निधनानंतर धारणगाव येथील मयत तरुणास तीव्र लक्षणे दिसून आल्यावर त्याचे स्राव तपासनीस नगर येथे पाठविण्यात आले होते त्यात तो बाधित आल्यावर त्याच्या अन्य नातेवाईकांचे स्राव तपासण्यात आले होते.त्यात ते बाधित आढळून आले होते.

कोरोना साथीने जगभर कहर उडवून दिला असून लाखो नागरिक या साथीत बळी गेला आहे.व अजूनही हि साथ थांबण्याचे नाव घेत नाही.देशात ३१ लाखाहून अधिक बाधित झाले आहे तर ५७ हजार ७१५ नागरिकांचा बळी गेला आहे.तर राज्यात बाधितांचा आकडा ६ लाख ८२ हजार ३८३ वर गेला असून मृत्यू २२ हजार २५३ वर गेले आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ४३३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २२७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ६८५ इतकी झाली आहे.त्यात १७९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८९ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार २७८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १३ हजार ११२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.८९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ४६९ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६८.४६ टक्के झाला आहे.हा रुग्ण बरे होण्याचा दर इतर देशाहून नक्कीच जास्त आहे.हि दिलासादायक बातमी आहे.मात्र हि साथ अद्यापही वाढत असून ती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धोका दिवसानजीक वाढताना दिसत आहे.मात्र हा आजार प्रारंभी लागण झाल्या बरोबर उपाय योजना केली तर लगेच उपाय योजनांना प्रतिसाद देताना दिसत आहे.मात्र नागरिक आपले नाव उघड होईल या भीतीने नाव सांगत नाही व होणारा त्रास लपवून ठेवत असल्याने त्यांची मृत्यूची गाठ पडत असल्याचे निष्पन्न होत आहे.या आजारापेक्षा नागरिक जास्त भीती घेताना दिसत आहे.धारणगाव येथील निधन झालेल्या तरुणांचे उदाहरण हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणून समोर आले आहे.

हा तरुण आपल्या एका पुणे येथून ब्राम्हणगावात आलेल्या मात्र बाधित असलेल्या नातलगांना भेटण्यास गेला होता.व सदर नातेवाईक कोरोना विषाणूने निधन झाल्यावरही त्यांच्या अंत्यविधिस हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.आलेल्या विशेष म्हणजे या नातलगाने आपली माहिती दडवली होती.व निधनानंतर धारणगाव येथील मयत तरुणास तीव्र लक्षणे दिसून आल्यावर त्याचे स्राव तपासनीस नगर येथे पाठविण्यात आले होते त्यात तो बाधित आल्यावर त्याच्या अन्य नातेवाईकांचे स्राव तपासण्यात आले होते.त्यात ते बाधित आढळून आले होते.त्यांना उपचारार्थ कोरोना केंद्रात दाखल करण्यात आल्यावर त्यांनी तेथून धूम ठोकली होती.मात्र त्या नंतर आरोग्य विभागाने अखेर पोलीस बळाचा वापर करून त्यांना उपचार केंद्रात भरती केले होते.त्यात हा तरुण खूपच शेवटच्या टप्प्यात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही त्याना या तरुणास वाचविण्यात अपयश आले आहे.व अखेर त्यात त्याची प्राणज्योत मालवली आहे.मात्र आधीच लक्षणे दिसल्या दिसल्या उपचार केले असते तर हा तरुण वाचला असता असे जाणकारांचे म्हणणे आहे.मात्र भीतीपोटी त्याने उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने थेट प्राणाशी गाठ पडल्याचे बोलले जात आहे.त्याच्या पच्छात आई,वडील,पत्नी,दोन लहान मुले असा परिवार आहे.हा तरुण बेपर्वाईचा बळी ठरल्याने त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close