जाहिरात-9423439946
आरोग्य

डॉ.श्रीराम मुरूमकर यांचे लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)

प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी

डॉक्टर विवेक श्रीराम मुरूमकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी डी एम एन इंटरवेन्शनल रेडिओलॉजी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉक्टर विवेक मुरूमकर यांनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतून पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई येथून एम.बी.बी.एस. पदवी परीक्षेत तसेच जी.एस. मेडिकल कॉलेज मुंबई येथून एम.डी.या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे.

महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर विवेक श्रीराम मुरूमकर यांनी केंद्र सरकार संचलित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोलॉजिकल सायन्स बंगलोर येथून जुलै २०२० मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. डॉक्टर विवेक मुरूमकर यांनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयतून पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई येथून एम.बी.बी.एस. पदवी परीक्षेत तसेच जी.एस. मेडिकल कॉलेज मुंबई येथून एम.डी.या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. सुपर स्पेशलिटी डी.एम. प्रवेशासाठी केंद्र सरकार संचलित नामांकित पाच इन्स्टिट्यूटमधून भरावयाच्या दहा जागा साठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या होत्या.त्यामधून (AIIMS) नवी दिल्ली येथे द्वितीय क्रमांकावर तर (NIMHAN) बंगलोर येथे चौथ्या क्रमांकावर त्यांची निवड झाली आहे. ऑगस्ट २०१७ जुलै २०२० या कालावधीत बेंगलोर येथे डी. एम. पूर्ण केलेले आहे. महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील डी.एम. हे शिक्षण घेणारे डॉक्टर विवेक मुरूमकर हे पहिले माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी डी.एम.इन इंटरवेन्शनल रेडिओलॉजी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सध्या ते बंगलोर येथील (NIMHANS)सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये स्पेशालिस्ट न्युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

डी.एम. इन इंटरवेन्शनल रेडिओलॉजी ही देशातील मेडिकल क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती आहे.या शस्त्रक्रियेमध्ये अंतर्गत मेंदूच्या शस्त्रक्रिया ॲन्जिओग्राफी, ॲ‍न्जोप्लास्टी,स्टेन बसवणे,रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज, मणक्याच्या रक्तवाहिन्यांच्या विविध शस्त्रक्रिया कोणतेही टाके न टाकता अथवा व्रण न दिसता केल्या जातात तसेच सिटी स्कॅन एमआरआय सोनोग्राफी यांचे निधन व रिपोर्टिंग केले जाते. डॉक्टर विवेक हे प्रवरानगर येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे फिजिक्स विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक व खर्डा शाखेचे माजी प्राचार्य श्रीराम मुरुमकर यांचे सुपुत्र आहेत. डॉक्टर विवेक यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, माजी प्राचार्य बि.जी.आंधळे माजी निरीक्षक अण्णासाहेब साबळे,बी.वाय. शिरसाठ प्राचार्य मधुकर अ‍नाप,डॉक्टर दीपक म्हस्के,शेखर बोराडे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठलराव ससे, नितीन हुसळे, पवार बी.एन,वसंतराव टाळके,पवार बी.डी. श्री व सौ मुत्तेपवार,संजीवनी आंधळे,बा.ज. भोर,गोरक्षनाथ बनकर, मुळीक डी.पी.,बाबासाहेब अंत्रे, सर्व समिती प्रमुख, सदस्य,शिक्षक,सेवकवर्ग,पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close