जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावला टाळेबंदी बनली आवश्यक!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व काल तब्बल ५० रुग्ण निघाल्याने व पर्यंत बारा रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या १२३ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ४० रुग्ण बाधित झाले आहे तर ८३ संशयीत निरंक आले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यात नगर येथे पाठवलेले अहवाल प्राप्त झाले असून यात सुदैवाने कोणीही बाधित आढळले नाही.तर उपचारानंतर ३२ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून आज आलेल्या अहवालात शहरातील २७ तर ग्रामीण भागातील १३ बाधित रुग्ण आढळले असून आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ६८५ झाली असून सक्रिय रुग्ण १७९ असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे वाढता रुग्णदरपाहता आता कोपरगाव शहराला आता जनता टाळेबंदीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०५ हजार ५७६ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३१ लाख १० हजार ७६१ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५७ हजार ७१५ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ लाख ८२ हजार ३८३ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २२ हजार २५३ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ४३३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २२७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

आज कोपरगाव शहरात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे आहे.गुलमोहर कॉलनी पुरुष वय-८५,गांधीनगर येथे दोन पुरुष वय-४४,३०,तर सात महिला वय-३२,१४,१३,४२,१५,१०,२७ आदींचा समावेश आहे.टिळकनगर येथे तीन पुरुष वय-१७,६२,५४ तर सात महिला वय-१९,२०,२२,५२,४५,२३,३४ आदींचा समावेश आहे, या शिवाय लक्ष्मीनगर येथे एक मुलगा वय-१५,कोपरगाव बेट येथे एक मुलगा वय-१३ तर मोहिनीराजनगर येथे एक ११ वर्षीय मूलगा यांचा समावेश आहे.या शिवाय श्रद्धा नगरी येथे एक पुरुष वय-५१,महादेवनगर येथे एक महिला वय-७०,सुदेश टॉकीज जवळ एक ५४ वर्षीय पुरुष,निवारा येथे एक ५७ वर्षीय पुरुषासह २७ जणांचा समावेश आहे.

तर तालुक्यात वाढलेले तेरा रुग्ण पुढील प्रमाणे आहे.त्यात मुर्शतपूर येथे दोन पुरुष वय-२५,५१ तर येसगाव येथे एक ३२ वर्षीय पुरुष तर तीन महिला वय अनुक्रमे-२९,१०,१२ याशिवाय धरणगाव येथे एक पुरुष वय-४८,तर दोन महिला दिव्य-६५,२०, तर कोकमठाण येथे एक पुरुष वय-३२ तर तीन महिला दिव्य अनुक्रमे -२९,१०,१२ तर पढेगाव येथे दोन महिला बाधित निघाल्या आहेत त्यांचे वय अनुक्रमे-३४,१३ आहे.तर शहापुर ग्रामपंचायत हद्दीत पहिल्यांदा महिला बाधित रुग्ण आढळला असून त्याचे वय-६० आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ६८५ इतकी झाली आहे.त्यात १७९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८९ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार २७८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १३ हजार ११२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.८९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ४६९ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६८.४६ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close