पर्यटन व तीर्थक्षेत्र
ह.भ.प.काशिनाथ दादा बारगळ यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
औरंगाबाद जिल्ह्यातील रत्नपुर तथा खुलताबाद येथील भद्रा मारोती संस्थानचे माजी अध्यक्ष तथा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचे निष्ठवान शिष्य काशीनाथ दादा बारगळ (वय-९०) यांचे आज औरंगाबाद येथे चार दिवसापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातच त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन भाऊ,दोन मुले,चार मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भद्रा मारोती संस्थान नावारूपास येण्याआधी तेथे केवळ चार पत्र्यांनी अच्छादलेले व वीट मातीच्या भिंती असलेले स्मशान भूमीनजीक बाभुळवनात असलेले उपेक्षित देवस्थान होते.नारायणगिरी महाराज यांच्या आदेशानेच त्यांनी या देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला व पुढे जवळपास पाच दशके यशस्वीपणे चालवला होता.जवळच काही कोटी रुपये खर्चून त्यांनी भद्रकुंडही त्यांनी विकसित केले होते.
साधारणपणे सत्तरच्या दशकात काशिनाथ दादा बारगळ यांनी व त्यांच्या जाणकार सहकाऱ्यांनी खुलताबाद येथील जीर्ण अवस्थेत असणाऱ्या भद्रा मारोतीचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले व ते शिवधनुष्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे पेलले.तेव्हापासून दादा संस्थानचे अध्यक्ष होते सर्व मंडळींना बरोबर घेऊन दादा संस्थानचा कारभार बघू लागले.विकासात,शिस्तीत दादांचा दरारा असायचा हळूहळू संस्थानचे प्रस्थ वाढू लागले.तत्कालीन खा.चंद्रकांत खैरे,माजी खा.मोरेश्वर सावे,प्रदिप जैस्वाल,यांच्यासोबतही दादांनी काम केले.विकासकामातही दादांचा शब्द अंतिम असायचा मंदीर परिसरातील नारळ विक्रेते,हाँटेल चालक,पार्किंग,या सर्वांना दादांनी एक शिस्त लावून दिली होती.व औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भद्रा मारोती संस्थानचा लौकीक वाढवला.दादांनी कधीही स्थानीक राजकारणात भाग घेतला नाही.मंदीर,शेती,हेच त्यांचे विश्व होते.दादा सरला बेट संस्थानचे महंत नारायणगिरीजी महाराजांचे कट्टर शिष्य होते.व ती ओळख त्यांनी शेवटपर्यंत जपली होती.
भद्रा मारूतीच्या कलशारोहन प्रसंगी व त्या आधी गदाने आदी दोन ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाचे आयोजन केले होते.त्यांनी सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले होते.परिसरात कोठेही कीर्तन असले की दादा तेथे आवर्जून हजेरी लावत असत.
महाराजांच्या नावाने कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे आली तर त्यास घरातील माणूस म्हणूच दादा वागणूक देत असत.भद्रा मारोती संस्थान येथे त्यांनी भद्रा मारूतीच्या कलशारोहन प्रसंगी व त्या आधी गदाने आदी दोन ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाचे आयोजन केले होते.त्यांनी सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले होते.परिसरात कोठेही कीर्तन असले की दादा तेथे आवर्जून हजेरी लावत असत.अलीकडील काळात त्यांनी सुलीभंजन पर्वताच्या विकासाचे काम हाती घेतले होते या पर्वतावर संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे मंदिर आहे.या विश्वस्त मंडळाचेही ते अध्यक्ष होते.तेथेही त्यांनी विकासाची गंगा आणली होती.भद्रा मारोती संस्थान नावारूपास येण्याआधी तेथे केवळ चार पत्र्यांनी अच्छादलेले व वीट मातीच्या भिंती असलेले स्मशान भूमीनजीक बाभुळवनात असलेले उपेक्षित देवस्थान होते.नारायणगिरी महाराज यांच्या आदेशानेच त्यांनी या देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला व पुढे जवळपास पाच दशके यशस्वीपणे चालवला होता.जवळच काही कोटी रुपये खर्चून त्यांनी भद्रकुंडही त्यांनी विकसित केले होते.अशा भद्रा मारोतीचे निस्सीम भक्त असणाऱ्या दादांचा आणि आमचा नारायणगिरी महाराज यांचे “नारायणगिरी अमृतवाणी”या मासिकाचे प्रकाशन करण्याच्या निमित्ताने व पुढे अनेक वेळा संपर्क आला होता.त्यांच्या निधनाचे निमित्ताने आज त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !