आरोग्य
कोपरगावात बँक अधिकाऱ्याचे कोरोनाने निधन !

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात सलग तीन दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत सात रुग्णांचे निधन झाले असताना आज पहाटे पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून कोपरगाव येथील बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक छत्रपती धोंगडी (वय-५४) यांचा या साथीने नागपूर येथे त्यांच्या राहत्या घरी बळी घेतल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने आता कोपरगाव तालुक्यात बळींची संख्या आठ झाली आहे.दरम्यान आज बँक बंद ठेवण्यात येऊन बँकेच्या सर्व सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना तातडीने आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान तालुका प्रशासनाने आज तातडीने बडोदा बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेत असणारे सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना तातडीने ताब्यात घेऊन कोविड सेंटर येथे तपासणीसाठी त्यांची रवानगी केली आहे.त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.दरम्यान या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलसुंदर यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.
काल पुन्हा एकदा कोरोना ९५ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा ३३ ने वाढला झाली असून काल नाशिक येथे पाठलेल्या एका श्रावांचा तपासणी अहवाल आला असून त्यात एक ४७ वर्षीय महिला बाधित आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली होती.तर चांदेकसारे येथील ५७ वर्षीय महिला व कोपरगाव टाकळी नाका येथील ७५ वर्षीय पुरुष असे दोघांचे निधन झाले असताना हि दुर्दैवी घटना उघड झाली आहे.
बडोदा बँकेचे व्यवस्थापक छत्रपती धोंगडी हे पंधरा दिवसांपूर्वी आपल्या घरी नागपूर येथे गेले होते.त्याना अन्य मधुमेह सारख्या दीर्घ व्याधी असल्याने व तिकडेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांना रुग्णालयात उपचाहरार्थ भरती करण्यात आले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.व त्यांची पहाटे पाच वाजेच्या सुमारास प्राण ज्योत मालवली आहे.ते तीन वर्षांपूर्वी बडोदा बँकेच्या कोपरगाव शाखेत आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते.शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी आपली तालुक्यात ओळख निर्माण केली होती.त्यांच्या निधनाने बँकेचे अधिकारी,कर्मचारी,ठेवीदार,कर्जदार,हितचिंतक यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान तालुका प्रशासनाने आज तातडीने बडोदा बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेत असणारे सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना तातडीने ताब्यात घेऊन कोविड सेंटर येथे तपासणीसाठी त्यांची रवानगी केली आहे.त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४५७ इतकी झाली आहे.त्यात ११९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.०५ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ३८७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार ५४८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.०१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३३१ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७२.४२ टक्के झाला आहे.