आरोग्य
सुरक्षा साधनांचा वापर करा अन्यथा टाळेबंदी-इशारा

जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना साथीने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना ४६ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा औद्योगिक वसाहतीतील रुग्णांसह २१ ने वाढला आहे त्यामुळे आता बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने चिंता वाढली आहे.त्यामुळे संवत्सर हद्दीतील नागरिकांनी आता सुरक्षेचे सर्व नियम पाळावे अन्यथा टाळेबंदी जाहीर करावी लागेल असा इशारा गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकताच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४२४ इतकी झाली आहे.त्यात ९० रुग्ण सक्रिय आहेत तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.१९ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार २९२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार १६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १८.२८ असा आढळला आहे हि चिंता वाढवणारी बाब आहे-राजेश परजणे
सदरचे सविस्तर वृत्त असे की,नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ५२२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १२९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत ५ बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह ४२४ रुग्ण बाधित झाले आहेत.आता क्रियाशील रुग्ण ९० असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे जिल्ह्यात या रुग्ण संख्येने खूपच चिंता वाढवली आहे.या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४२४ इतकी झाली आहे.त्यात ९० रुग्ण सक्रिय आहेत तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.१९ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार २९२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार १६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १८.२८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३२४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७७.३२ टक्के झाला असल्याने ग्रामस्थांनी हि साथ सामान्य समजू नये.त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी जाताना हात स्वच्छ करूनच घरात प्रवेश करावा.जंतूंनाशकांचा वापर करावा,तोंडास मुखपट्टी बांधूनच सार्वजनिक जागी आवश्यक असेल तरच जावे व गर्दीत प्रवेश करू नये.बाहेरील वस्तूंना काही काळ घराबाहेर ठेवावे,अन्य नागरिकांपासून किमान दोन मीटर अंतर राखावे असे आवाहन अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेवटी केले आहे.