आरोग्य
कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढ !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला असला तरी गत दोन दिवसापासून रुग्ण वाढीला आळा बसला असल्याचे चित्र असताना आज पुन्हा एकदा कोरोना ४७ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा १८ ने वाढला आहे.तर १० स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.आलेल्या अहवालात २९ जण निरंक आले आहेत.यात पढेगाव येथील तीन पुरुष त्यात दोन बालके (वय-३८,८,६),निवारा कॉर्नर येथील एक स्त्री (वय-५०) एक पुरुष (वय-२९ ) तर इंदिरापथ येथील एक स्त्री ( वय-३१) एक पुरुष वय-५४) असे दोघे जण बाधित आले आहेत तर समतानगर येथील चार पुरुष त्यात सात वर्षीय दोन बालकांसह (अन्य रुग्णांचे वय-१४,३३) तर दोन स्रिया असे सहा जण बाधित आढळले आहे. तर संजीवनी कारखाना येथील एक तीस वर्षीय स्त्री तर औद्योगिक वसाहत येथील एक ५३ वर्षीय पुरुष तर विवेकानंद येथील तीन पुरुष (वय-४२,६८,४४ ) असे एकूण १८ जण बाधित आढल्याने पुन्हा एकदा तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ५ हजार २६८ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २५ लाख ३० हजार ४९० वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ४९ हजार १७० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ७२ हजार ७३४ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १९ हजार ४२७ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार १५२ वर जाऊन पोहचला आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ५ हजार २६८ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २५ लाख ३० हजार ४९० वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ४९ हजार १७० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ७२ हजार ७३४ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १९ हजार ४२७ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार १५२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १२८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत ५ बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह रुग्ण बाधित झाले आहेत.आता क्रियाशील रुग्ण असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ४०३ इतकी झाली आहे.त्यात ७८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.२४ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार २५६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार ०२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.८६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३२० इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७९.४० आढळला असल्याची माहितीही डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी दिली आहे.