शैक्षणिक
आढाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५.१२ टक्के
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचा शालांत परीक्षा मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो ९५.१२% इतका लागला आहे.प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आढाव माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विध्यार्थ्यांचे कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला आहे व त्यांच्या घरच्या परिस्थितीची माहिती घेऊन विध्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले आहे.त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक मदत करण्याचे पालकांना आश्वासन दिले आहे त्यासाठी पालकांना स्वतः चा मोबाईल क्रमांक देऊन अडचणीच्या काळात संपर्क साधण्याचे आश्वासन दिले आहे.
कोपरगाव नगरपरिषद शहरातील उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश देऊन त्यांची शिक्षणाची भूक भागविण्याचा प्रयत्न करत आहे.कोणतेही शैक्षणिक साधन,ना कोचिंग क्लास,वेळ प्रसंगी स्वतः काम करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी यश मिळवून दाखवले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांत
रोहिणी भीमा सोनवणे हिने ७५% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.सदर विद्यार्थिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती परंतु शिकण्याची इच्छा त्यामुळे आईने तिला माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात दाखल केले होते.तिला वडिलांचा आधार नसताना व आईचे आजारपण असताना लहान भाऊ,घरासाठी लागणारा खर्च शनिवार,रविवार शेतीवर रोजंदारी करून हे यश संपादन केले तिच्या यासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर
शुभम रामदास जाधव या विद्यार्थ्याने ७४% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.सदर विद्यार्थ्याला वडिलांचा आधार नसताना घरात कमावणारे कोणीही नाही,फावल्या वेळेत इतर रोजंदारीचे कामे करून त्याने हे यश मिळवले आहे हे विशेष ! तर वैष्णवी संभाजी घाटे या विद्यार्थिनीने ७३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.सदर विद्यार्थिनीचे वडील वाहन चालक असून आई रोजंदारीने कामाला जाऊन तिने या मुलीचे शिक्षण केले आहे.घरात चार बहिणी परिस्थिती हलाकीची कुठल्याही प्रकारची शिकवणी नाही या सर्व परिस्थितीतून मार्ग काढीत केवळ शिकण्याच्या इच्छा शक्तीवर तिने हे यश संपादन केले आहे.या यशाचे सर्व स्थरातून कौतुक होत असून,विद्यालयाचे अध्यक्ष व नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष योगेश बागुल,शिक्षण सभापती मंगल आढाव,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक,शालेय समितीचे सर्व सदस्य,कोपरगाव नगरपालिकेचे,सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.