जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सर नजीक तरुणांची आत्महत्या ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर नजीक असलेल्या मुंबई-नागपूर राज्यमार्गावरील पुलावरून काल वैजापूर येथील रहिवाशी असलेल्या वीस वर्षीय तरुण गणेश अशोक पवार याने अज्ञात कारणाने पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणांचे शव आपल्या ताब्यात घेतले असून ते उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले आहे.

दरम्यान हा तरुण वैजापूर येथील मूळ रहिवाशी होता तो अविवाहित असून तो शिर्डी,पुणतांबा चौफुली आदी ठिकाणी हॉटेलवर वेटरचे काम करत होता,तो व्यसनांच्या अधीन असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्याच्या मृत्यूचे कारण शव विच्छेदन केल्यावर स्पष्ट होईल अशी माहिती कोपरगाव शहर पोलीस सूत्रांनी दिली आहे.त्याच्या पच्छात आई,वडील,एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन स्थळ पंचनामा केला आहे.पुढील तपास पो.हे.कॉ.श्री गवसने हे करीत आहेत.या घटनेबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close