कोपरगाव तालुका
सार्वजनिक उत्सव टाळण्यात सर्वांचे हित-पो.नि.कटके

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी काळ कठीण आहे.कोरोनावर अद्याप उपचार निघलेला नाही.कोरोना साथ वर्तमानात जोरात सुरु आहे.बचाव हाच त्यापासून वाचण्याचा प्रमुख उपाय आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करावा कोणीही सार्वजनिक गणेशोत्सव हा सर्वांचा आहे.मात्र काळ प्रतिकूल आहे.याचे सर्वांनी भान ठेवावे लागणार आहे.त्यातच आपले सर्वांचे हित असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकअनिल कटके यांनी एका बैठकीत केले आहे.
आगामी गणेशोत्सवानिमित्त कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राम्हणगाव,येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या वेळी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने,शिवबा प्रतिष्ठानचे अनुराग येवले,दिनेश कोल्हे,हे.कॉ.आंधळे,पोलीस पाटील रवींद्र बनकर,सोमनाथ डफळ,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदिसंह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आगामी काळ कठीण आहे.कोरोनावर अद्याप उपचार निघलेला नाही.कोरोना साथ वर्तमानात जोरात सुरु आहे.बचाव हाच त्यापासून वाचण्याचा प्रमुख उपाय आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करावा कोणीही सार्वजनिक गणेशोत्सव हा सर्वांचा आहे.मात्र काळ प्रतिकूल आहे.याचे सर्वांनी भान ठेवावे लागणार आहे.त्यातच आपले सर्वांचे हित असल्याचेही श्री कटके यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी पोलीस पाटील रवींद्र बनकर यांचा करोना काळात लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने अनुराग येवले यांनी सत्कार केला आहे.पाटील तसेच ज्ञानतंत्र बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचा पोलीस पाटील रवींद्र बनकर यांनी सत्कार केला आहे.