जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव शहर व ग्रामीण मध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात इतरत्र कोरोना संशयितांचे अहवाल निरंक आले असताना कोपरगाव शहरात गोदाम गल्ली येथे एक प्रसिद्ध कान, घशाचे एक डॉक्टर व रवंदे ग्रामपंचायत हद्दीत एक बँड पथकातील पासष्ट वर्षीय इसम असे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कोपरगावच्या ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.त्यामुळे आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.नजीक शिर्डीत या रुग्णांनी चाळीशी कधिच ओलांडली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ३ हजार ६१३ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १० लाख ८१ हजार ४७७ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या २६ हजार ८७३ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख ०० हजार ९३७ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू ११ हजार ५९६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०१ हजार २२० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.त्यामुळे आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.नजीक शिर्डीत या रुग्णांनी चाळीशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.तालुक्यात सुरेगावात उच्चांक झालेला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत पंधरा रुग्ण कोरोना बाधित आढळले होते हा आत्तापर्यंतचा मोठा विक्रम आहे.आता या दोघांची त्यात भर पडून ही संख्या सतरा झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्ष असणे गरजेचे आहे

आज कोपरगाव शहरात विवेकानंदनगर येथील राहिवाशी व गोदाम गल्लीत एका सिनेमागृहा नजीक रुग्णालय असलेले एक पंचावन्न वर्षीय प्रसिद्ध डॉक्टर व रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील एक बँड पथकातील पासष्ट वर्षीय इसम दोन रुग्ण व या परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात करण्यास सुरुवात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close