जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा एक महिला बाधित

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोल्हे सहकारी साखर कारख्यानावरील संशयित १५ रुग्णासह ताब्यात घेतलेल्या ४४ जणांचे श्राव तपासणी अहवाल आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आले असून त्यात सुखशांतीनगर येथील रहिवासी असलेल्या मात्र संवत्सर येथे नोकरीस असलेल्या बाधित शिक्षकाची पत्नी बाधित निघल्याची माहिती हाती आली असून बाकी ४३ जणांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात अद्यापही काही तरुण,नागरिक कोरोना साथी बाबत दक्ष दिसत नाही मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.आता बाहेरून नागरिक येत असले तरी टाळेबंदीच्या तडाख्यातून सुटका झाल्याचा आनंद झाल्याने काहींना उकळ्या फुटून ते लग्न,दहावे,तेरावे,सुपाऱ्यांचे कार्यक्रम झोकात करून थाळा वाजवून कोरोना साप घरात घालण्याचे काम सुखनैव करत असल्याचे शिर्डी नजीक दिसून आले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ३ हजार ६१३ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा १० लाख ८१ हजार ४७७ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या २६ हजार ८७३ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ३ लाख ०० हजार ९३७ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू ११ हजार ५९६ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ०१ हजार २२० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.अलीकडील काही दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या असली तरी चाळीशीच्या वर असलेल्या नागरिकांनाही या साथीत बळी पडावे लागत आहे.त्यामुळे आता हि साथ छोटी खेडीही आपल्या मगर मिठीत घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.नजीक शिर्डीत या रुग्णांनी चाळीशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.तालुक्यात सुरेगावात उच्चांक झालेला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

कोपरगावही त्याला अपवाद नाही.आता बाहेरून नागरिक येत असले तरी टाळेबंदीच्या तडाख्यातून सुटका झाल्याचा आनंद झाल्याने काहींना उकळ्या फुटून ते लग्न,दहावे,तेरावे,सुपाऱ्यांचे कार्यक्रम झोकात करून थाळा वाजवून कोरोना साप घरात घालण्याचे काम सुखनैव करत असल्याचे शिर्डी नजीक दिसून आले आहे.कोपरगाव येथेही तोच खेळ सुरु आहे.त्यामुळे प्रशासन सूचना देत असेल तर त्या पाळणे गरजेचे आहे.अद्यापही अनेक जण संशयित म्हणून प्रशासनाने ताब्यात घेण्याचे काम सुरूच आहे.त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका तहसीलदार योगेश चंद्रे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close