जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोघांचे अपहरण,चौघांना एक दिवसांची कोठडी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील कापड व्यापाऱ्यांच्या मुलाचे अपहरण करून दहा लाख रुपये द्या अन्यथा अपहरीत तरुण आत्महत्या करील अशी धमकी देऊन त्यांना लुबाडण्याच्या उद्देशाने कोपरगावात अपहरण घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघड झाल्याने आरोपी सचिन राजेंद्र कुसुंदर रा.लक्ष्मीनगर कोपरगांव,सचिन संजय साळवे रा.गजानननगर कोपरगांव,आकाश विजय डाके रा.गोकुळनगरी कोपरगांव,शुभम केशव राखपसारे रा.कोर्टरोड कोपरगांव या चार आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी कापड व्यापारी बबनराव बालाजी पवार (वय-७०) रा.समतानगर कोपरगाव यांनी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसानी या चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यानां आज कोपरगाव येथील तिसरे अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यासमोर दुपारी दोन वाजता हजर केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान या घटनेत या दोघांचे आपापसात देणेघेणे असून हा अपहरणाचा बनाव केला असल्याचे बोलले जात असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

सदर चे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी कापड व्यापारी यांचे कोपरगावात कापड दुकान आहे.फिर्यादीस व त्याच्या मुलास आरोपी सचिन कुसुंदर याने गत वर्षी दहा लाख रुपये नोटरी करून उसनवारी दिल्याची माहिती आहे.मात्र एक वर्ष उलटूनही व वायदा संपुनही ती रक्कम मिळत नाही म्हणून या दोघांत वादावादी सुरु झाली होती.शुक्रवार दि.१७ जुलै रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास आरोपीने हि रक्कम फिर्यादी बबनराव पवार यांच्या मुलगा कृष्णा पवार यांचेकडून वसूल करण्यासाठी त्याचा कामगार अक्रम शेख यालाही सोबत घेऊन त्याला बालगणेश किडस वेअर्स,गांधी पुतळा कोपरगांव येथून अन्य आरोपी सचिन साळवे,आकाश डाके,शुभम राखपसारे,या तिघांना मदतीस घेऊन व मारुती स्विफ्ट कारचा (क्रमांक एम.एच.१२-एन.बी.-२४८२) हीचा वापर आधी गोड बोलून नंतर त्यांना शिर्डी रस्त्याने पळवून नेले व तेथे त्यांचे भ्रमणध्वनी,स्कुटर,व दुचाकी आपले ताब्यात ठेवुन त्यांना शिर्डी येथे एका हॉटेलवर व कार मध्ये डांबुन ठेवुन दोघांना मारहाण करुन जिवे मारणेची धमकी देवुन फिर्यादी बबनराव पवार यांचा अपहरीत मुलगा श्रीकृष्ण पवार याचे फोनवरुन त्याचा घरी असलेला भाऊ अनिल पवार याचे मोबाईल वर फोन करुन,”अर्जंट कोपरगावातील सचिन सावजी याचे घरी १० लाख रुपये पोहच कर,तु जर पैसे दिले नाही,तर अपहरण केलेला तुझा भाऊ कृष्णा पवार हा आत्महत्या करील” असे धमकी वजा बोलण्यास भाग पाडले आहे वगैरे फिर्यादीच्या मजकुरावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं.२६५/२०२० भादविक.३६४(अ),३८७ प्रमाणे वरील चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close