जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना योद्धयांचा कोपरगावात चित्ररूपी सत्कार

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूने अवघे जग व्यापून तो दशांगुळे उरला असताना या धोक्याबाबत देशातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक जन आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे मात्र तरीही नागरिक कोरोना विषानू बद्दल गांभीर्याने घेत नाही.यातच कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाचे कलाध्यापक अमोल निर्मळ यांनी कोरोना बाबत “कोरोना हरेल, देश जिंकेल” या विषयावर जनजागृती करणारे फलक लेखन पोस्टर रेखाटन करून शहरातील नागरीकांना परीस्थीतीची जाणीव करून देत असतानाच कोपरगाव शहरासह शिर्डी शहरामध्ये या युद्धात दिवस-रात्र काम करणारे शासकीय अधिकारी,डॉक्टर,पोलीस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,पत्रकार यांचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोरोना विषानूच्या पार्श्वभूमीवर अमोल निर्मळ यांनी लॉकडाऊन च्या काळात मार्च महिन्यापासून जे अधिकारी सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहे. त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलेच्या माध्यमातुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

कोरोना विषानूच्या पार्श्वभूमीवर अमोल निर्मळ यांनी लॉकडाऊन च्या काळात मार्च महिन्यापासून जे अधिकारी सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहे. त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलेच्या माध्यमातुन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यामध्ये शिर्डीचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोविंद शिंदे कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे,नायब तहसीलदार योगेश कोतवाल,कोपरगाव नगरपालीका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ,पोलीस उपअधिक्षक शिर्डीचे सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते, व वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौंदर,विशेष वैदयकीय अधिकारी वैशाली आव्हाड,स्वच्छतादूत सुशांत घोडके तसेच कोपरगावचे पत्रकार यांचाही कलेच्या माध्यमातुन व्याक्तिचित्रे रेखाटून त्यांच्या कार्याचा सन्मान केला त्यात अनेकांचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. त्याबद्दल या योद्ध्यांनीं समाधान व्यक्त केले आहे.

तसेच कोरोना जनजागृतीसाठी त्यांनी फलक व पोस्टर रेखाटन करून जनजागृती केली व नागरीकांना परीस्थीतीची जानीव करनारे चित्रे रेखाटले त्यामध्ये मास्कचा वापर,वारंवार स्वच्छ हात धुवा,गर्दी टाळा अंतर ठेवा,”घरीच रहा, सुरक्षित रहा” असे फलक रेखाटन करून हा संदेश सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवले आहे.

निर्मळ यांनी यापूर्वीही ग्रामस्वच्छता अभियान,पर्यावरण,मतदान जागृती,स्त्रीभ्रुन हत्या,अशा अनेक सामाजिक विषयांवर चित्र रेखाटून जनजागृतीचे काम केले आहे. त्यामूळे त्यांना राज्यस्तरीय अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.त्याच्या या सामाजीक कार्याबद्दलच त्यांना नुकताच राज्यस्तरीय महाराष्ट्र चित्र सम्राट हा ही पुरस्कार मिळालेला आहे.त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close