आरोग्य
…यांनी दिले रुग्णवाहिणीस मोफत इंधन !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान कालखंडात कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात कहर उडवून दिला असताना त्या साठी व बऱ्याच नकारात्मक बातम्यांचा वर्तमानात महापूर आलेला असताना कोपरगाव तालुक्यातून एक सकारात्मक बातमी हाती आली असून कोपरगाव तालुका हद्दीत कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंप चालक मंगेश जपे यांनी रुग्णवाहिणीस लागणारे इंधन मोफत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिल्याने त्यांचे तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी व पेट्रोल पंप चालक मंगेश जपे यांनी कोरोना रुग्ण ने-आण करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या रुग्णवाहिकेस इंधन देण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांसाठी समाधानाची बाब आहे.उपसभापती-अर्जुन काळे
कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत भयावह वेगाने संपूर्ण देशभरात वाढतो आहे.५ हजार ४८० रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी १ हजार ०७८ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत हे भीतीदायक आहे. अहमदनगर जिल्ह्यातही वेगाने मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोपरगाव तालुक्यातील ७ हजार जणांना दक्षतेत ठेवलेले आहे.नजीकच्या राहाता तालुक्यातही रुग्ण आढळल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकही आता भीतीच्या सावटात आले आहे.या घातक विषाणूंची बाधा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये तर १४ दिवस काहीच लक्षणे दिसत नसल्याने खरा धोका आहे.अशा स्थितीत नागरिकांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी व पेट्रोल पंप चालक मंगेश जपे यांनी कोरोना रुग्ण ने-आण करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या रुग्णवाहिकेस इंधन देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे नागरिकांना बरोबर कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,आदींनी अभिनंदन केले आहे.