आरोग्य
…या परिसरात सामाजिक अंतराचा फज्जा !
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
भारतात व राज्यात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार उडवलेला असताना अद्यापही संवत्सर व परिसरातील गावात ग्रामस्थांना त्याचे गांभीर्य जाणवलेले दिसत नसून पोलीस व महसूल,आरोग्य प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही सकाळच्या प्रहरी चौका-चौकात व पारावर त्यांच्या शिराळक्या सुरु असताना दिसत आहे. याबद्दल सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या नाठाळाना पोलिसानी सरळ करावे अशी मागणी केली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार २३७ इतकी झाली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार २९७ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार २३७ इतकी झाली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार २९७ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत आसताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदर नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी आमंत्रण देत आहे.या बाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी वारंवार आवाहन करूनही काही ग्रामस्थ दाद देत नसतील तर यांच्यावर कारवाईचा केली जावी अशी मागणी अन्य नागरिकांमधून आता होऊ लागली आहे.संवत्सर,पढेगाव.आदी ठिकाणी याचा दाहक अनुभव येत सल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळवली आहे.या नागरिकांवर आता कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागलीय आहे.