आरोग्य
“कुलुपबंदीचा” निर्णय वाढवा-नगराध्यक्ष वहाडणे यांची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात अद्यापही सर्वाधिक वेगाने कोरोना विषाणू वाढत असून नागरिकांच्या उज्वल भवितव्यासाठी व सुरक्षेसाठी आगामी काळात राज्यात शहरे व गावे यांना लागू केलेला “कुलुपबंदीचा” निर्णय वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत भयावह वेगाने संपूर्ण देशभरात वाढतो आहे.५ हजार ४८० रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी १ हजार ०७८ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत हे भीतीदायक आहे. अहमदनगर जिल्ह्यातही वेगाने मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोपरगाव तालुक्यातील ६ हजार ७८२ जणांना दक्षतेत ठेवलेले आहे. या घातक विषाणूंची बाधा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये तर १४ दिवस काहीच लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने कुलुपबंदीचा निर्णय आणखी पुढे ढकलणे गरजेचे आहे-वहाडणे
अनेक करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिल पर्यंत हा “कुलुपबंदीचा” निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने कुलुपबंदीचा मुदत पुढे वाढवली जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या एका नेत्याने याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत भयावह वेगाने संपूर्ण देशभरात वाढतो आहे.५ हजार ४८० रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी १ हजार ०७८ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत हे भीतीदायक आहे. अहमदनगर जिल्ह्यातही वेगाने मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोपरगाव तालुक्यातील ७ हजार जणांना दक्षतेत ठेवलेले आहे. या घातक विषाणूंची बाधा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये तर १४ दिवस काहीच लक्षणे दिसत नाहीत. म्हणून निर्णय घेणाऱ्या सर्व संबंधित शासकिय यंत्रणा व नेत्यांना विनंती आहे कि,”कुलुपबंदीचा” कालावधी वाढविणे गरजेचे आहे. असा निर्णय अनेकांना त्रासदायक ठरणारा आहे यात शंका नाही. त्यांना आधार म्हणून शासनाने मदतीचा हात दिलेलाच आहे. त्यात वाढ करावी. परंतु सर्वच बँकांसमोर आज पैसे काढण्यासाठी रांगा लागलेल्या दिसतात त्या मुळेही प्रादुर्भाव वाढण्यास मदत आहे. म्हणून शासनाने बँकांना आदेश देऊन खातेदारांना घरपोच पैसे देण्याची सोय करावी. ज्या खातेदारांना पैसे काढायचे आहेत त्यांनी बँकेला फोन करून किंवा संदेश देऊन खात्यातून किती रक्कम काढायची हे सांगितल्यास बँकेचा प्रतिनिधी घरपोच पैसे नेऊन देऊ शकतो. ही प्रक्रिया अवघड वाटत असली तरी सर्वच खातेदार बँकांशी (के.वाय. सी.) जोडलेले असल्याने तसे करता येणे शक्य आहे.असे निर्णय घेत असतांना जनतेला काय वाटते याचा विचार न करता जनतेचे प्राण वाचवण्यासाठी जे जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते ते निर्णय कठोरपणे घेतले गेले पाहिजेत. सर्वच राजकिय पक्षांनी व नेत्यांनी सुद्धा असे निर्णय घेतल्यास एकमताने शासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. नागरिकांनीही शासकिय यंत्रणेचा अंत न पाहता घरातच बसून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.