जाहिरात-9423439946
आरोग्य

भाजीपाला नियोजन,…या पालिकेची फत्ते शिकस्त !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशभरात कोरोना विषाणूने कहर मांडलेला असताना नागरिकांनी एकत्र येऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनेकवेळा प्रयत्न करूनही नागरिक दाद देत नव्हते मात्र यावेळी कोपरगाव नगरपरिषदेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मार्गर्शनाखाली वेळेत नियोजन केल्याने आज भाजीपाला खरेदीचा वार असतानाही गर्दी होताना दिसली नाही.त्यामुळे तहसीलदार,योगेश चंद्रे,नगराध्यक्ष,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी “फत्ते शिकस्त” केल्याच्या शहरात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस असण्याची गरज नाही राज्यात अद्यापही कोरोनाची रुग्ण आढळत आहेत.हि धोक्याची घंटा आहे.त्यामुळे खबरदारी घेण्यासाठी भाजीपाला खरेदी व किराणा माल खरदेसाठी तीन दिवसा ऐवजी एक किंवा दोन दिवस पुरेसे आहेत.त्या बाबत पालिका प्रशासनाने नक्कीच विचार करावा अशी मागणी अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

दरम्यान कोपरगाव पालिकेने दुसरीकडे इंदिरा पथ मार्गावर जंतूनाशक फवारणीवर जोर दिलेला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे त्याचे छायाचित्र.

देशभरात ३५४ नवे करोनाग्रस्त सापडल्याने देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४२१ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. लॉकडाउन १४ एप्रिल पर्यंत पुकारण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दिवसेंदिवस देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र खबरदारीचे उपाय योजूनही करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. आत्तापर्यंत ११७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांकडून केंद्राला देण्यात आला आहे. आता यावर विचारविनीमय सुरु आहे. लॉकडाउन वाढणार की आणखी काही निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान नागरिक अद्यापही सामाजिक अंतराबाबत गंभीर असल्याचे अनेक शहरात दिसत नाही.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नव्हते मात्र या वेळी कोणताही धोका पत्करायचा नाही असा निश्चय कोपरंगाव नगरपरिषद पदाधिकारी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता.या बाबत रविवारचा अनुभव चांगला नव्हता.भाजीपाला व फळ विक्रेते यांनी एकाच गर्दी केली होती.फळविक्रेते यांना हातगाडीवर गावभर फिरून विक्री करण्याचे आदेश असतानाही अनेकांनी गावात पालिकेने ठरवून दिलेल्या अठरा ठिकाणीच गर्दी करून एक मीटर या सामाजिक अंतराची पायमल्ली केली होती.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला होता.या बाबत आमच्या प्रतिनिधीने या बाबत बातमी देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.त्याबाबत खळबळ उडाली होती.यावेळी प्रशासनाने आधीच सर्व भाजीपाला व फळ व्यापारी यांना कडक इशारा दिलाच पण शहारातील अठरा ठिकाणी भाजीपाला व्यापारी व शेतकरी यांना परवानगी दिली तर फळ व्यापारी यांना केवळ तहसील मैदानावर सामाजीक अंतर ठेऊन साधारण पंचवीस फूट अंतर ठेऊन आपल्या गाड्या लावण्याची परवानगी दिली.त्यामुळे खरेदीदार यांना गर्दी करणे अशक्य झाले व पालिका व आरोग्य विभागाचा एक मीटर हा नागरिकांचा सामाजिक अंतराचा निकष पूर्ण झाला व धोका टळण्यास मदत झाली आहे.शहरत नागरिकांची मर्यादेत संख्या आढळून आली आहे.पालिकेच्या या नियोजनाबादद्दल शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे,तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close