जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उपेक्षित समाजाला जेवणाची भ्रांत,नगराध्यक्षांनी घेतली दखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासह तालुक्यात वर्तमानस्थितीत शहरे व गावे लॉक डाऊन करण्यात आल्याने ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे अशा आर्थिक दुर्बल घटकाना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दोन घासासाठी मोठी यातायात करावी लागत आहे.कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या नव्या औद्योगिक इमारतीच्या पूर्वेस काही आर्थिक दुर्बल कुटुंबे आपले ग्रामीण भागात घमेले विक्रीचा व्यवसाय करतात मात्र त्यावर लॉक डाऊनने गंडांतर आले आहे.हातातोंडाची गाठ पडणे अवघड झाले असून खाणारी तोंडे जास्त व येणारे सामाजिक संस्थांचे जेवणाचे डबे कमी असल्याने त्यांची उपासमार होत होती या बाबत काही नागरिकांनी वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास हि बाब आणून दिली असता त्यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे या समस्येकडे लक्ष वेधून घेतले असता त्यांनी गुरुद्वारा समितीच्या हि बाब लक्षात आणून दिल्याने त्यांनी हि समस्या सोडवली आहे.

कोपरगाव शहरातील नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उत्तरेस काही अल्पसंख्याक समाजाचे नागरिक राहतात.ते ग्रामीण भागात दुचाकीवर जाऊन आपला प्लास्टिक सामान विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात.मात्र त्यांच्या या व्यवसायावर सध्या गंडांतर आले आहे.तसे अनेकांवर ते आले आहे.मात्र अनेकांची रोजी रोटी चालविण्याची किमान क्षमता तरी आहे.मात्र या कुटुंबाचे सकाळी कमाई करायची व सायंकाळी आपले दोन घास पोटात रिचवायचे हा नित्य दिनक्रम मात्र त्यात आता कोरोना विषाणूने मोठा व्यत्यय आणला आहे.

देशभरात ३५४ नवे करोनाग्रस्त सापडल्याने देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४२१ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दिवसेंदिवस देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र खबरदारीचे उपाय योजूनही करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. आत्तापर्यंत ११७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे.त्यामुळे अनेकांच्या व्यापार उदिमावर कुऱ्हाड कोसळली आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.

कोपरगाव शहरातील नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उत्तरेस काही अल्पसंख्याक समाजाचे नागरिक राहतात.ते ग्रामीण भागात दुचाकीवर जाऊन आपला प्लास्टिक सामान विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात.मात्र त्यांच्या या व्यवसायावर सध्या गंडांतर आले आहे.तसे अनेकांवर ते आले आहे.मात्र अनेकांची रोजी रोटी चालविण्याची किमान क्षमता तरी आहे.मात्र या कुटुंबाचे सकाळी कमाई करायची व सायंकाळी आपले दोन घास पोटात रिचवायचे हा नित्य दिनक्रम मात्र त्यात आता कोरोना विषाणूने मोठा व्यत्यय आणला आहे.त्यामुळे हे कुटुंब हताश झाले आहे.त्यांना माजी नगरसेवक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साई गाव पालखीचे कार्यकर्ते १८ डबे पूरवीत होते.मात्र खाणारी तोंडे जास्त असल्याने ते पुरेसे नसल्याने त्यांची कोंडी झाली होती याबाबत एका कार्यकर्त्यांचा दूरध्वनी आल्याने हि बाब आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी हि घटना गुरुद्वारा समिती कोपरगाव यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन या उपेक्षित नागरिकांची सोय करून दिली आहे.संबंधित नागरिकांनी अध्यक्ष विजय वहाडणे व गुरुद्वारा समिती,साई गाव पालखी यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close