कोपरगाव तालुका
..या गावातील दिव्यांगाना किराणा सामानाचे वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या संकटात दिव्यांगाना आधार देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगाना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश कानडे यांचे संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निधीतील दिव्यांग पाच टक्के निधीमधून वारी गावातील सुमारे ७६ दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला आहे.त्यात किरणासह आवश्यक सामानाचा समावेश आहे.त्याबाबत दिव्यांग नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायत वारी येथील दिव्यांगाच्या पाच टक्के निधीमधून वारी गावातील सुमारे ७६ दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला असल्याचे सरपंच श्री कानडे यांनी सांगितले
दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे किराणा सामान देण्यात आले आहे.त्यामध्ये बाजरी ५ की , साखर २ की.ग्रॅ. ,तुरडाळ १ की.ग्रॅ. ,शेंगदाणे १ की.ग्रॅ. गोडतेल १ की.ग्रॅ., बेसन १ की.ग्रॅ.मीठ १ की.ग्रॅ. , मुगडाळ ५०० ग्रॅ. ,चहा पावडर २०० ग्रॅ.,मिरची पावडर १०० ग्रॅ.,हळद पावडर १०० ग्रॅ.,साबण २ नग , डेटॉल १ ,सॅनीटायझर १ देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व लाभार्थ्यांना किराणा सामान संच घर पोहच देण्यात आले दिव्यांग व्यक्तीनी या उपक्रमामुळे या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,विस्तार अधिकारी डी .ए. रानमळ,उपसरपंच मनीषा गोर्डे ,ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे ,ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके ,महेंद्र बागुल, विजय गायकवाड,सुवर्णा गजभिव,गोकुळ कानडे, विशाल गोर्डे ,प्रशांत संत आदी मान्यवर उपस्थित होते.