जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा वारसा डॉ.राजरत्न आंबेडकर चालवतील-आशावाद

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अस्पृश्यतेच्या आणि जातीयतेच्या अंधारात पडलेल्या कोट्यावधी लोकांचा उद्धार केल्यामुळे ‘युगपुरुष’, ‘महामानव’ आणि ‘अस्पृश्यांचा उद्धारक’ म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला जातो.दलित चळवळीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याचा वारसा डॉ.राजरत्न आंबेडकर हे समर्थपणे पुढे चालवतील आशावाद आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहरात बांधण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे लोकार्पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव व बुद्धिस्ट यंग फोर्सचे सल्लागार साहेबराव कोपरे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,डॉ.गोवर्धन हुसळे,महाराष्ट्र पतसंस्था असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, तहसीलदार विजय बोरुडे,शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,अॅड.भास्कर गंगावणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर,एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष रणधीर,के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष पगारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.गोरक्षनाथ रोकडे,बाबासाहेब पगारे, रमेश घोडेराव,बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन,उपाध्यक्ष नितीन शिंदे,सचिव राहुल खंडीझोड,कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे,खजिनदार संजय दुशिंग,ज्ञानदेव दुशिंग,दादा जगताप,अॅड.नितीन पोळ,रमेश गवळी, सचिन शिंदे, प्रशांत कोपरे,रमेश मोरे,संजय कांबळे,मनोज शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”डॉ.राजरत्न आंबेडकर त्यांच्या परिवाराच्या विचारांचा वारसा घेवून वाटचाल करीत असून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माध्यमातून भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डॉ.राजरत्न आंबेडकर भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय त्रिभुवन यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार नितीन शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close