जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेत…’त्या’ वक्तव्याबाबत धरणे आंदोलन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेत नुकताच एका युवराजाने आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बेछूट आरोप केल्या प्रकरणी आज पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करून त्याचा निषेध व्यक्त केला आहे.काही काळानंतर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे विनंतीवरून सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

“नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी हे चांगली सेवा देण्याचा,सार्वजनिक मालमत्तेची उधळपट्टी होणार नाही याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केलेला आहे.व आगामी काळात नगरपरिषद आणि त्यांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी राजकीय कारणासाठी व वापली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक बेछूट आरोप करू नये”-कोपरगाव नगरपरिषद कर्मचारी आवाहन.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यात दि.३० जून रोजी सत्तातंर झाले आहे.राज्यात बाळसेनेचे व भाजपचे सरकार स्थानापन्न झाले आहे.त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील राजकीय चित्र बदलले असल्याचे दिसत असून आपणच सरकारमध्ये बसलो असल्याचा भास काही,’ईशान्य’ गडावरील युवराजांना होऊ लागला आहे.त्या हवेतच अनाधिकाराने त्यांनी वर्तमानात तहसीलदार कार्यालय,नगरपरिषद आदी ठिकाणी आढावा बैठकांच्या नावाखाली ‘राजकीय शिमगा’ सुरु केला आहे.व कोपरगावातील राष्ट्रवादीचा सत्ताधारी गट हा शिमगा निमूटपणे पाहत आहे.(या पूर्वी असे कधी झाले नाही हे वास्तव असताना) असाच आढावा बैठकीचा कार्यक्रम आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत नुकताच कोपरगाव नगरपरिषदेत नुकताच संपन्न झाला आहे.त्यात मनसेचे एक जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्याने थेट मुद्द्यालाच हात घातला असून बांधकाम विभागातील एक अधिकारी कोपरगावातील,”एका आबाच्या टपरीवर बसून ठेकेदारांचे पाकिटे घेत असल्याचा” शेलका आहेर अर्पण केल्याने या खेळास सुरवात झाली आहे.त्यामुळे त्याचे प्रतिध्वनी उमटणे स्वाभावीक म्हटले पाहिजे आणि झाले हि तसेच.आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी एकत्र येत,’धरणे आंदोलना’ची घोषणा केली होती.त्याला प्रतिसादही मोठा मिळाला आहे.

“आपण पाकिटाचा उल्लेख केला आहे हे खरे असले तरी पाकीट नेमके कशाचे याबाबत कोणीही संभ्रम निर्माण करून नये आपले शहराचे सामाजिक हित सर्वोच्च असून नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी व्यक्तिशः वैर नाही,कोणावरही आकस नाही कोणीही गैरसमज करू नये”-संतोष गंगवाल,उपाध्यक्ष,मनसे,नगर जिल्हा.

सदर प्रसंगी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना,नगरपरिषद कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटनां आदींनी धरणे आंदोलन सुरु केले होते.व त्यात,”राजकीय गटाच्या भांडणात कोणताही आधार नसताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वैयक्तिक आकसापोटी सदर बेछूट आरोप केला असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव नगरपरिषद ठेकेदार संघटनेने आपले निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता यांचेवर केलेले आरोप निराधार असून ते आरोप ठेकेदार नाकारत आहे व सदर घटनेचा ठेकेदार निषेध व्यक्त करत आहे”.

“नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी हे चांगली सेवा देण्याचा,सार्वजनिक मालमत्तेची उधळपट्टी होणार नाही याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केलेला आहे.व आगामी काळात नगरपरिषद आणि त्यांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी राजकीय कारणासाठी व वापली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक बेछूट आरोप करू नये” असे आवाहन केले आहे.व तहसीलदार विजय बोरुडे आणि मुख्याधिकारी शांताराम गोसावी याना आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्याधिकारी यांनी आवाहन केले होते त्यांच्या विनंतीवरून सदर आंदोलन रद्द केले असल्याचा दावा केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close