शैक्षणिक
संगीताकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक-गीतकार सौदागर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सद्याच्या संघर्षमय आणि धाकाधकीच्या आयुष्यात सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने साहित्य व संगीताकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.माणसांनो गाण्यावर प्रेम करा, त्यामुळे तुमचे जीवन आनंदमय व सुसंस्कारित होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार,पटकथा संवाद लेखक बाबासाहेब सौदागर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील प्रतिभेचा घेतलेला शोध आणि त्यादृष्टीने केलेली वाटचाल हेच यशाचे गमक आहे.जी माणसे आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करीत मोठी झाली ती आपल्यातील प्रतिभेमुळेच.स्वतः यशस्वी झालो आहे”-बाबासाहेब सौदागर,चित्रपट गीतकार.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे हे होते.
सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन भगीरथ शिंदे,संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पद्माकांत कुदळे,कारभारी आगवन,मंच्छिंद्र रोहमारे,बाळासाहेब कदम आदी मान्यवरांसह सांडूभाई पठाण,कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.अरुण देशमुख,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.माधव यशवंत,कर्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कार्यालयीन सेवक,पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील प्रतिभेचा घेतलेला शोध आणि त्यादृष्टीने केलेली वाटचाल हेच यशाचे गमक आहे.जी माणसे आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करीत मोठी झाली ती आपल्यातील प्रतिभेमुळेच.स्वतःच्या यशस्वी जीवनाचे रहस्य सांगत आईचे महत्त्वही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून आग्रहाने विषद केले.सदर प्रसंगी ॲड.भगीरथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता,क्रीडा,सांस्कृतिक,राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना विभागातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला आहे.
सदर कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सुभाष देशमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.सुनील काकडे व डॉ.बी.बी.देवकाते यांनी केले तर जिमखाना चेअरमन प्रा.सुनील सालके यांनी आभार मानले आहे.