जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…या गावात हरिनाम सप्ताहाची सांगता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. पढेगांव येथील ह.भ.प.सुभाष महाराज जगताप यांच्या काल्याच्या किर्तनानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कार्यक्रमांनी गेले सात दिवस संवत्सरगांव गजबजून गेले होते.

“श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण संपूर्ण विश्वात आजवर झाला नाही.अलौकीक पराक्रम,अप्रतिम बुध्दीमत्ता असामान्य स्वार्थत्याग अंगी बाणलेला असा हा अवतारी पुरुष प्रत्येकाच्या मनात परमेश्वराचा अवतार म्हणून ठाई ठाई विराजमान झालेला आहे.श्रीकृष्णाचे चरित्र अत्यंत दिव्य असून कृष्णलीलांचे वर्णन शब्दातून व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी श्रीकृष्ण चरित्रात एकरूप व्हावे लागेल”-ह.भ.प.सुभाष महाराज जगताप.

प.पू.वै.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने गत पन्नास वर्षापासून संवत्सरगांवात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.त्यासाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.यावर्षी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील,उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

काल्याच्या किर्तनातून ह.भ.प.जगताप महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्रावर विचार व्यक्त केले.श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण संपूर्ण विश्वात आजवर झाला नाही.अलौकीक पराक्रम,अप्रतिम बुध्दीमत्ता असामान्य स्वार्थत्याग अंगी बाणलेला असा हा अवतारी पुरुष प्रत्येकाच्या मनात परमेश्वराचा अवतार म्हणून ठाई ठाई विराजमान झालेला आहे.श्रीकृष्णाचे चरित्र अत्यंत दिव्य असून कृष्णलीलांचे वर्णन शब्दातून व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी श्रीकृष्ण चरित्रात एकरूप व्हावे लागेल.ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी पुन्हा अवतार घेईन आणि धर्मरक्षण करेल असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमधून सांगितले आहे. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचे सार आहे.कसे जगावे,कसे वागावे याचे सुंदर मार्गदर्शन गीतेतून मिळते असे सांगून ह.भ.प.जगताप महाराज यांनी संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या सप्ताहाच्या निटनेटक्या नियोजनावद्दल आयोजकांचे कौतूक करुन हा सोहळा भविष्यातही असाच अखंडपणे सुरू रहावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सप्ताहात संवत्सरसह कोकमठाण,दहेगावबोलका,सडे,वारी,कान्हेगांव,भोजडे आदी गांवातील भजनी मंडळे सहभागी झाली होती.संवत्सर परिसरातील रामवाडी,लक्ष्मणवाडी,दशरथवाडी, विरोबा चौक या ठिकाणच्या भजनी मंडळांनी रात्रंदिवस पहारा दिला.च्या सांगता समारंभानंतर आमटी भाकराचा महाप्रसाद देण्यात आला आहे. सांगता समारंभात सर्वश्री विवेक परजणे,खंडू फेपाळे,सोमनाथ निरगुडे,लक्ष्मणराव सावळे,दिलीप ढेपले,ज्ञानदेव कासार,सुभाष लोखंडे, लक्ष्मणराव परजणे,चंद्रकांत लोखंडे,कोळपेवाडी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फकिरा बोरनारे,अॅड.शिरीष लोहकणे यांच्यासह प्रचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर। सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश परजणे फौन्डेशनच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय,जनता हायस्कूल,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.सप्ताह काळात योगदान देणाऱ्या पुरुष व महिलांचा यावेळी सत्कार व गौरव करण्यात आला.उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close