कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील..या सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कान्हेगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी काळे गटाचे रामदास चौधरी व उपाध्यक्षपदी सुनिल काजळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुकल्यातील नुकत्याच पार पडलेल्या कान्हेगाव सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता हिसकावून घेत या संस्थेवर आपला झेंडा रोवला आहे.
या सोसायटीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या नावाची सूचना दीपक भाकरे यांनी मांडली सदर सूचनेस गोरख सांगळे यांनी अनुमोदन दिले व उपाध्यक्ष पदाच्या नावाची सूचना गोपीनाथ भाकरे यानी मांडली त्या सूचनेला सोपान काळे यांनी अनुमोदन दिले.दोन्हीप्रत्येकी एकेक अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी दीपक सावंत यांनी नूतन अध्यक्ष रामदास चौधरी व उपाध्यक्ष सुनिल काजळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी लक्ष्मण चौधरी,दिनकर काजळे,देवचंद कडेकर,बंकटराव जगताप,मच्छिंद्र जगताप, जनार्दन जगताप,बबनराव सांगळे,अरुण भाकरे,दादासाहेब भाकरे,कडूबा खिलारी,राजेंद्र चौधरी,बाळकृष्ण ठाकरे,देवचंद काजळे,सचिव ज्ञानेश्वर मंचरे आदी मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.