जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रकच्या धडकेत दोन ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड रस्त्यावर रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना फिर्यादीचा मामा अण्णासाहेब भिमाजी लबडे (वय-५८) व त्यांचा सहकारी दत्तात्रय नाना पवार (वय-५७) यांना अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहे.या प्रकरणी फिर्यादी प्रदीप अंबादास पवार (वय-३२) रा.टाकळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर वाहन मात्र या घटने नंतर फरार झाले आहे.

संकल्पित छायाचित्र

फिर्यादीचा मामा व त्याचा एक सहकारि हे दोघे रविवार दि.२९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास ते फिरण्यासाठी म्हणून गेले असता त्यांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहांनाने धडक दिली असून त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यातील एक जण जागीच ठार झाला होता.तर एकास तातडीने स्थानिक नागरिकांनी उपचारार्थ लोणी येथील रुग्णालायत दाखल केले असता त्यास तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,फिर्यादी हे कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असून त्यांचे मयत मामा आण्णासाहेब लबडे व त्यांचा सहकारी दत्तात्रय पवार हे दोघे काही कामानिमित्त भेटण्यास आले होते.रविवार दि.२९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास ते फिरण्यासाठी म्हणून गेले असता त्यांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहांनाने धडक दिली असून त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यातील एक जण जागीच ठार झाला होता.तर एकास तातडीने स्थानिक नागरिकांनी उपचारार्थ लोणी येथील रुग्णालायत दाखल केले असता त्यास तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध फिर्यादी प्रदीप पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९१/२०२२ भा.द.वि.कलम ३०४,(अ) २७९,३३८,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ) (ब) १७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close