कोपरगाव तालुका
कोपरगावातील सरकारी डॉक्टरही ‘त्या’ दौऱ्यात सामील !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावात ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या डॉक्टरांना मदत करण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील काही डॉक्टर सामील असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली असून या ‘पेंच अभयारण्य’ सैर करणाऱ्या डॉक्टरांचा फोटोच आमच्या प्रतिनिधीस हाती लागला असून यात सरकारी रुग्णालयात आपली सेवा बजावणाऱ्या एका प्रथितयश डॉक्टरचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान ते ‘या’रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लुबाडण्यात पुढे असलेल्या ‘रॅकेट’मध्ये सामील आहे का ? अशी चर्चा शहर व तालुक्यातच सुरु झाली आहे.
या छायाचित्रात उजवीकडून वर्तुळ केलेले वादग्रस्त सरकारी डॉक्टरच छायाचित्रात दिसत आहे.
बातमी प्रसिद्ध झाल्यावर काही सुज्ञ नागरिकांनी या डॉक्टरचा पर्दा पाश केला असून त्या सैरीचे फोटोच आमच्या प्रतिनिधींच्या हाती लागले आहे.त्यात कोपरगावात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या एका डॉक्टरचे त्यात स्पष्ट छायाचित्र दिसून येत आहे.त्यामुळे या टोळीत हे महाशय सामील आहे का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या संभाजी चौकानजीक असलेल्या मोठया रुग्णालयास मदत करणाऱ्या खेड्यापाड्यातील व शहरातील काही खाजगी सेवा बजावणारे डॉक्टर ‘कट प्रॅक्टिस’च्या जाळ्यात अडकले असल्याचे उघड होत आहे.त्यांनी स्वतःचे चांगभले करण्यासोबतच नव्याने उभारलेल्या मोठ्या रुग्णालयाचे उखळ पांढरे केले आहे.या मोठ्या रुग्णालयांसोबत साटेलोटे करून ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना नुकतीच कोपरगाव शहरातील कोरोनात अग्रणी भूमिका निभावणाऱ्या एका खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरने अशा तब्बल ५२ दलाल डॉक्टरांना,”पेंच अभयारण्या”ची सैर घडविली असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.
हि बातमी प्रसिद्ध झाल्यावर काही सुज्ञ नागरिकांनी या डॉक्टरचा पर्दा पाश केला असून त्या सैरीचे फोटोच आमच्या प्रतिनिधींच्या हाती लागले आहे.त्यात कोपरगावात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या एका डॉक्टरचे त्यात स्पष्ट छायाचित्र दिसून येत आहे.त्यामुळे या टोळीत हे महाशय सामील आहे का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
रुग्णसेवेऐवजी निव्वळ नफा हा वैद्यकीय व्यवसायाचा उद्देश झाला,तेव्हापासून या व्यवसायाचे बाजारीकरण झाल्याचा आक्षेप काही वैद्यकीय क्षेत्रातील काही सेवाव्रती तज्ज्ञ नोंदवतात.शहरी व ग्रामीण भागांमध्ये ‘कटप्रॅक्टिस’ वेगळ्या पद्धतीने सुरू असली,तरी अमर्याद नफा हाच उद्देश असतो,असे ते अनुभवाने सांगतात.शहरातल्या डॉक्टरांना परदेशी दौरे,महागड्या भेटी, क्लिनिकमध्ये ए.सी.(वातानुकूलित कक्ष) अशी बक्षिसी या ‘कट’मध्ये दिली जाते,तर ग्रामीण भागात डॉक्टरांच्या गाडीत पेट्रोल टाकून देण्यापासून रोजचा हॉटेल खर्चही लॅब,टेक्निशिअन, एक्सरे युनिट्सच्या माध्यमातून केला जातो.अनेक रुग्णालयांनी तर मेडिकल आपल्याच दवाखान्यात सुरु करण्याची पद्धत सुरु केली आहे.त्यात मेडिकल वाल्याला विशिष्ट टक्केवारी देण्यात येते.यात अनेक नाना प्रकार आहेत आता लोक यावर किमान बोलू लागले आहे.
साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी विंचवाच्या विषावर लस शोधणारे डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी त्यांच्या पेशंटला सीटी स्कॅन करायला पाठवल्याबद्दल कटचा चेक आल्याची तक्रार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केली होती.वैद्यकीय क्षेत्रात जी गोष्ट वर्षोनुवर्ष गपगुमान सुरू आहेत,त्यालाच डॉक्टरांनी धक्का दिला होता.डॉक्टरांच्या परदेशी दौऱ्यांना,त्यांना मिळणाऱ्या महागड्या भेटींच्या मुद्द्यांला कटकमिशन मध्ये मोडायचे की नाही,यावरून तेव्हा बरीच चर्चा झाली होती.असे डॉक्टर आता दुर्मिळ आहे.
‘कट’कमिशनची साखळी रुग्ण घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्यापासून सुरू होते,असाही अनुभव ग्रामीण भागांमध्ये येतो.रात्री-अपरात्री अडलेल्या पेशंटला ज्या डॉक्टरकडे जायचे असेल,त्याचा दवाखाना बंद असल्याचे सांगून कमिशन देणाऱ्या डॉक्टरांकडे नेणारे गाडीवालेही असतात.किरकोळ आजारासाठी असंख्य वैद्यकीय चाचण्या करायला लावणारे काही डॉक्टर ठरवून दिलेल्या पॅथलॅबना गरज नसलेल्या चाचण्यांचे अहवाल नॉर्मल द्या असाही सल्ला आवर्जून देतात.
सर्वच वैद्यकीय व्यावसायिक असे नसतीलही परंतु महाग झालेले वैद्यकीय शिक्षण,अन्य सर्वच क्षेत्रांतील महागाई,वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या देखभालीचा खर्च असे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत.असे असले तरी यातील अपप्रकार वेळीच थांबवणे आवश्यक आहे.कोपरगावातील एका सरकारी रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी व प्रवासासाठी कोरोना नसल्याचे दाखले देणे बंधनकारक करण्यात आले होते.त्यावेळी तर येथील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली ‘हाथ की सफाई’ दाखवून मोठी लूट केल्याचे आमच्या प्रतिनिधीने उघड केले होते.त्यावेळी या वैद्यकीय अधिकाऱ्याचे कलेक्शन करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या व कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेकडील तालुक्यातून जाऊन-येऊन करणाऱ्या एका महिला वैद्यकिय कर्मचाऱ्याशी केलेली वर्तणूक अनेकांच्या समरणात आहे.आजही सरकारी रुग्णालयात पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक नाही.याकडे लक्ष द्यायला राजकीय नेतृत्वाला वेळ नाही हे विशेष ! यालुटीला राजकीय आश्रय तर नाही ना ! अशी शंका शहरवासीयांच्या मनात निर्माण झाली तर नवल नाही.
कोपरगावात काही डॉक्टर आणि रुग्णालये खरच चांगली वैद्यकीय सेवा देतात.काही विश्वस्त व्यवस्थेची (ट्रस्ट) रुग्णालये तर विनामुल्य सेवा देत आहे.त्यामुळे खान्देश,मराठवाडा,विदर्भ आदी भागातून या रुग्णालयात रुग्ण मोठ्या विश्वासाने येत आहेत हे नाकारता येत नाही.अशी सेवा देणारे डॉक्टर आणि त्यांची रुग्णालये हे कोपरगाव आणि राहाता तालुक्याचे भूषण आहे.काही डॉक्टर आणि त्यांचे रुग्णालये सामाजिक कार्यातही ते आघाडीवर आहे.
या अप प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये कायद्याचा मसुदा प्रसिद्ध झाला होता.परंतु कायदा बनण्याच्या प्रक्रियेला पुढे कोण आडवे आले हे समजायला मार्ग नाही.कारण हा कायदा संमत होण्यासाठी सरकारने पुढे काहीच केलेले दिसून येत नाही.याविषयी काहींनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत माहिती विचारली असता तेव्हा मिळालेल्या उत्तरामध्ये,‘याविषयाची धारिका मंत्री,वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये यांच्याकडे १८ मे २०२१ या दिवशी सादर केली आहे’, असे सांगण्यात आले आहे.याहून पुढे ‘कायद्याची प्रत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांच्याकडे आलीच नाही’, असे सांगण्यात आले. हा मसुदा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,मुंबई हे प्रसिद्ध करते.परंतु कायद्याची समिती ज्या विभागाने नेमली,तो वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यासंदर्भात संपूर्ण अज्ञान प्रकट करत असल्याचे काहीं तज्ज्ञांचे मत आहे.
‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस इन हेल्थकेअर सेक्टर कायदा २०१७’ या कायद्याचा कच्चा मसुदा आणि माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेली माहिती काही सामाजिक संघटनांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आहे
कोपरगावात काही डॉक्टर आणि रुग्णालये खरच चांगली वैद्यकीय सेवा देतात.काही विश्वस्त व्यवस्थेची (ट्रस्ट) रुग्णालये तर विनामुल्य सेवा देत आहे.त्यामुळे खान्देश,मराठवाडा,विदर्भ आदी भागातून या रुग्णालयात रुग्ण मोठ्या विश्वासाने येत आहेत हे नाकारता येत नाही.अशी सेवा देणारे डॉक्टर आणि त्यांची रुग्णालये हे कोपरगाव आणि राहाता तालुक्याचे भूषण आहे.काही डॉक्टर आणि त्यांचे रुग्णालये सामाजिक कार्यातही ते आघाडीवर आहे.रुग्णांची अडवणूक करणे कधी त्यांच्या बाबत घडलेले दिसून आलेले नाही.त्याच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.मात्र या रुग्ण व समाज विरोधी भूमिका घेणाऱ्या अपप्रवृत्तीवर चाप कोणी लावायचा.
डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण घेताना अमाप खर्च येतो हे मान्य जरी केले तरी ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवायची तेच गाळे कापू लागले तर समाजाची घडी व विन विस्कटून जाण्यास वेळ लागणार नाही हे विसरता कामा नये.मात्र येथे नेमके हेच होत आहे.यावर सुज्ञ डॉक्टर त्यांच्या संघटना,सुज्ञ नागरिक आणि सामाजिक संघटना यांनी बोलते व्हायला हवे.प्राध्यापक,डॉक्टर,शिक्षक,अभियंते,वरिष्ठ अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ.मात्र त्यांनी समाजाचे गळे आणि खिसे कापण्यास सुरुवात केली तर आगामी काळ भयंकर मानला पाहिजे व समाजाने यावर बोलते व्हायला पाहिजे.