जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुग्ध व्यवसाय कमी असणाऱ्या भागात लक्षवेधी कार्यक्रम राबविणार-शहा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ज्या भागात दुग्ध व्यवसायाचे प्रमाण कमी आहे अशा भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनाअंती निदर्शनास आलेले आहे.अशा भागात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण आणि लक्षवेधी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे चेअरमन मिनेश शहा यांनी नुकतेच कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“स्व.नामदेवराव परजणे यांच्या स्मृतींना उजाळा देताना गोदावरीच्या कार्यस्थळावर चाळीस वर्षापूर्वी दूध उत्पादकांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करुन या व्यवसायाला चालना दिली.शासनाकडून दुधाला भाववाढ करवून घेतली.न भूतो न भविष्यती अशा मेळाव्यामुळे दूध धंद्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होऊन शेतीला पूरक म्हणून हा व्यवसाय जोमाने करु लागले”-हरिभाऊ बागडे,अध्यक्ष,औरंगाबाद जिल्हा दूध संघ.

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड,आनंद,गुजरात या संस्थेच्या सहकार्याने बाईक माऊंटेबल मिल्कींग मशिनचा वितरण कार्यक्रम संघाच्या कार्यस्थळावर नुकताच पार पडला.त्या वेळी ते बोलत होते.

सदर कार्यक्रमास रतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष मंगलजीत राय,विधानसभेचे माजी सभापती व औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना,अमूल डेअरीचे अध्यक्ष शामलभाई पटेल,भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे कार्यकारी संचालक के.सी.सुपेकर,संचालक व्यंकटराव नाडगौडा,संचालक सत्यव्रत बोस,कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा,प्रादेशिक प्रमुख अनिल हातेकर,महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार,गोदावरीचे संचालक राजेंद्र जाधव,गोदावरी दूध संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर,संचालक उत्तमराव माने, भाऊसाहेब कदम,यशवंत गव्हाणे,कारभारी थोरात,सदाशिव कार्ले,दिलीप तिरमखे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी,अधिकारी व कर्मचार उपस्थित होते.
देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रासाठी जी मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिलेली आहे तिचा अवलंब राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या माध्यमातून करण्यात येत असून देशपातळीवर प्रभावशाली पध्दतीने सहकारीतेला प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे. दुग्ध व्यवसाय आणि तत्सम उद्योगाच्या विकासासाठी योजना आणि कार्यक्रम तयार करण्याचा आमचा सतत प्रयत्न राहिलेला आहे.श्वेतक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरीयन यांनी दुधाची वाणवा असलेल्या देशाला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.आज आपल्या भारत देशात वाढलेला दुग्ध व्यवसाय ही डॉ.कुरीयन यांचीच देणगी असल्याचे सांगून श्री मिनेश शहा यांनी पुढे सांगितले की,दुग्ध व्यवसायात प्रचलित पध्दत न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधीक अवलंब होणे गरजेचे आहे.खाजगी अथवा सहकारी संस्था यामध्ये प्रत्यक्ष दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर देणे कधी कधी शक्य होत नाही.अपारदर्शकता या प्रमुख कारणांबरोबरच दूध उत्पादन वाढीसाठी होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ न बसणे ही बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आहे.

गाईंच्या संकरीकरणाबाबतचे धोरण योग्य व सक्तीने राबविले जात नाही.चुकीचे व अनियंत्रीत संकरीकरण होत असल्याने संकरीत गाईंची दूध देण्याची क्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसाय अधिक किफायतशीर कसा होईल याकडे व्यवसायिकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही शहा यांनी शेवटी सांगितले आहे.
प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रास्तविक केले तर भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष मंगलजीत राय,कार्यकारी संचालक के.सी.सुपेकर,महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार यांची उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close