कोपरगाव तालुका
सर्वच धर्मियांचे भोंगे काढून फेकले पाहिजे-…या माजी नगराध्यक्षांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण देशभरात सध्या मस्जिदिवरील भोंगे-अजान विरुद्ध मंदिरातील हनुमान चालीसा पठण या विषयावर वादविवाद-चर्चा-आरोप प्रत्यारोप व राजकारण सुरू आहे.एकमेकांना आव्हान देण्याची भाषा सुरू झाल्याने सामाजिक वातावरण कलुषित होत असल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला असून सर्वच धर्मियांचे भोंगे काढून फेकले पाहिजे अशी मागणी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
“काही राजकारणी मतांचे गठ्ठे जपण्यासाठी पडद्याआड राहून आगीत तेल ओतण्याचे कुटिल राजकारण करत आहेत.खरे तर विविध प्रकारच्या ध्वनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मात्र कुणीही चर्चा करायला तयार नाही.न्यायालयाचे आदेश असूनही नियमांचे पालन होत नाही.प्रत्येकजण स्वतःचेच म्हणणे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत.राजकारणी फक्त मतांचाच विचार करताहेत हे दुर्दैवी आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला होता.राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंना भाजपने पाठिंबा देऊ केला आहे.त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.त्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते विजय वहाडणे यांनी या वादात उडी घेतली आहे.व आपली प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”काही राजकारणी मतांचे गठ्ठे जपण्यासाठी पडद्याआड राहून आगीत तेल ओतण्याचे कुटिल राजकारण करत आहेत.खरे तर विविध प्रकारच्या ध्वनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मात्र कुणीही चर्चा करायला तयार नाही.न्यायालयाचे आदेश असूनही नियमांचे पालन होत नाही.प्रत्येकजण स्वतःचेच म्हणणे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत.राजकारणी फक्त मतांचाच विचार करताहेत.म्हणून केंद्र शासनाने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्वच धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकर-भोंगे त्वरित काढून टाकले पाहिजेत.सार्वजनिक ठिकाणी अजान-नमाज असो कि आरती-महाआरतीला शतप्रतिशत बंदी घालून,सर्व धार्मिक सण-उत्सव आपापल्या धार्मिक ठिकाणी-बंदिस्त जागेतच पार पाडावे लागतील असाच कठोर कायदा करून त्याची अंमलबजावणीही केली पाहिजे.अन्यथा या विषयावर होणारे वाद-राजकारण कधीही थांबू शकणार नाही.कुठलाही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम,मिरवणुकाही शासनाच्या परवानगी शिवाय करता येणारच नाहीत असाही कायदा बनविणे अत्यंत गरजेचे आहे.हॉस्पिटल-शिक्षण संस्था-आजारी जेष्ठ नागरिक-रुग्णांचा कुठलाही विचार न करता सर्रासपणे नियम धुडकावून डी.जे.लावले जातात.ज्यांना धर्माबद्दल फारच आस्था-प्रेम आहे त्यांनी आपले धर्म-विधी-सण आपल्या घरातच साजरे केले पाहिजेत.असे केले नाही तर वारंवार सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही.कितीजणांना धार्मिक प्रार्थना-आरत्या-नमाज तोंडपाठ आहेत ? असा कडवा सवाल करून प्रत्येकाने विचार करून आपला धर्म आपल्या स्वतःच्या घरापूरता मर्यादित ठेवावा असे आवाहन विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.