कोपरगाव तालुका
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कारखान्याच्या कामगारांना सुट्टी !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी कारखाना व उद्योग समुहातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कर्मचाऱ्यांना ३१ मार्च पर्यंत पगारी सुट्टी जाहीर केली आहे.
मानवतावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कंत्राटी कामगारांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कारखान्याच्या सर्व कंत्राटी कामगारांच्या बाबतीत देखील हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे-आ. काळे
कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे हटले आहे की, जगभरासह आपल्या राज्यात कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसचा प्रसार होवू नये यासाठी शासनाने सर्व नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे बहुतांशी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची सवलत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये व कारखाना कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मानवतावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कंत्राटी कामगारांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कारखान्याच्या सर्व कंत्राटी कामगारांच्या बाबतीत देखील हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या सर्व बैठका, समारंभ, कार्यक्रम देखील स्थगित करण्यात आले आहे. साखर आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार कारखाना परिसरात सर्वत्र फलक,प्रसिद्धी फलक लावून व सामाजिक संकेत स्थळाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.आ.काळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वत:ची व कुटंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील त्यांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करून फोनच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांचे प्रश्न व अडीअडचणी ते सोडवीत असल्याची माहिती कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी शेवटी दिली आहे.