जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वाला सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यांचे बहुमोल विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या वैज्ञानिक विचारांची आज देशाला गरज आहे असे प्रतिपादन श्री साईंबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली,तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांचा आजही भारतात आदर केला जातो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली,तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.त्यांना केंद्र सरकारने १९९० साली मरणोपरांत ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे.त्यांची जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,भन्ते आनंद सुमनजी,माजी नगरसेवक संदीप पगारे,मेहमूद सय्यद, दिनकर खरे,मायादेवी खरे,फकीर कुरेशी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सचिव रेखा जगताप,सुनील मोकळ,रावसाहेब साठे,प्रकाश दुशिंग,विजय त्रिभुवन,संजय कांबळे,साहेबराव कोपरे,डॉ.गोवर्धन हुसळे,साहेबराव रणशूर,उषा उदावंत,शितल वायखिंडे आदींसह समाजबांधवव भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपल्या देशाला पुढे घेवून जाण्यासाठी देशाची एकता,अखंडता टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे.समाजविघातक विचारांना बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी समाजाचा एकोपा अत्यंत महत्वाचा असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारातून दाखवून दिले आहे.त्याचबरोबर भारतात मोठे धरण बांधण्याचे तंत्रज्ञान तसेच बहुउद्देशीय प्रकल्प निर्माण करण्याच्या कामात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताच्या विकासाचे जनक म्हणून संबोधले जाते.देशाला प्रगतीचे यशोशिखर गाठण्यासाठी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचारांची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

यावेळी रात्री बारा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यानी शहरात विविध ठिकाणी डॉ.आंबेडकर जयंती निमित्त एकवीस तोफांची सलामी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close