जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव आगारात ‘समता पाणपोई’ चे उद्घाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट व समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा निमित्ताने ऐन उन्हाळ्यात कोपरगाव बस आगारातील प्रवाशांसाठी पाणपोईचे उदघाटन आगार व्यवस्थापक यांच्या प्रमुख उपस्थितीत तर समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

“कोपरगाव आगाराचे नूतनीकरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले पण कोपरगाव आगारात उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होत असते त्यावर एक उपाय म्हणून समता ट्रस्टच्यावतीने समता पाणपोई च्या माध्यमातून प्रवाशांना स्वच्छ आणि फिल्टर युक्त पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देत आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता नागरी पतसंस्था कोपरगाव.

सदर प्रसंगी समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक गुलशन होडे,व्यापारी दीपक अग्रवाल,समता पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड,कोपरगाव आगारचे माजी वाहक विष्णुपंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगाव आगारच्या आगार प्रमुख उज्वला कुटे,वरिष्ठ लिपिक औदुंबर गादी,मिलिंद कोपरे,वाहतूक नियंत्रक आशिष कांबळे,नवनाथ बढे,दिलीप आहेर,आगार लेखागार सुनीता गवळी यांची ही उपस्थिती होती.

सदर प्रसंगी कोयटे म्हणाले की,”कोपरगाव आगाराचे नूतनीकरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले पण कोपरगाव आगारात उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होत असते त्यावर एक उपाय म्हणून समता ट्रस्टच्यावतीने समता पाणपोई च्या माध्यमातून प्रवाशांना स्वच्छ आणि फिल्टर युक्त पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देत आहोत.पाणपोईवर दररोज दोन कर्मचारी नियुक्त केले असून ते स्वतःकर्मचारी बसमध्ये जाऊन प्रवाशांना जागेवर जाऊन पाणी देणार आहे.यासाठी साई सृष्टीचे व्यवस्थापक गणेश बोरुडे यांचे मोलाचे सहकार्य असणार आहे.
कोपरगाव आगाराच्यावतीने समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कोयटे,उद्घाटक गुलाबचंद अग्रवाल,संचालक गुलशन होडे यांचा सत्कार आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी तर जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांचा सत्कार आगार कार्यशाळा अध्यक्ष अमोल बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच समता पतसंस्था मुख्य कार्यालयातील उपस्थित अधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार कोपरगाव आगार वाहतूक नियंत्रक गंगाधर सानप यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close