कोपरगाव तालुका
संवत्सर येथून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रानोडे वस्तीवर घरासमोर उभी करून ठेवलेली बजाज कंपनीची प्लॅटिना ( क्रं.एम.एच.१७ सी.ई.३६७३) हि अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी चोरून नेल्याची फिर्याद संदीप कचेश्वर रानोडे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी संदीप रानोडे यांनी आपल्या फिर्यादी म्हटले आहे ली,आपल्या घरा समोर आपण आपली सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी करुन ठेवली असता अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी ती २९ नोव्हेंबर रात्री दहा वाजे पासून ते ३० नोव्हेंबर २०१९ रोजी पर्यंतच्या वेळेत चोरून नेली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक गवसने हे करीत आहेत.