जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आता चंदनाच्या झाडाची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक ४८ मधील आपल्या मालकीचे चंदनाचे चार हजार रुपये किंमतीचे झाड अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची फिर्यादी कोळपेवाडी येथील शेतकरी विक्रम शिवाजी कोळपे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्यामुळे चंदन शेतकऱ्यांच्या मनात भीती पसरली आहे.

कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.त्यामुळे चोरट्यांची नजर या वृक्षकडे वळाली असल्यास नवल नाही.चंदनचोरी हा तसा जुना रोग असल्याने याला प्राधान्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गु.र.नं.९१/२०२० भा.द.वि.कलम ३७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एल.ढाका हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close