जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शेतात गेलेल्या महिलेचा विनयभंग,कोपरगावात आरोपीवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली महिला आपल्या शेतातील विहिरीजवळ दि.१८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्युत पंप बंद करण्यासाठी गेली असता त्याच गावातील आरोपीने तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तळेगाव मळे सह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घरातील माणसांनी विहिरीवरील विद्युत पंप बंद करण्यास सदर महिलेला सांगितले होते.ती दि.१८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपले नियोजित काम करण्यास गेली असता तिच्या पाळतीवर असलेला त्याच गावातील व तिच्याच आडनावाचे साधर्म्य असलेला आरोपी याने तिला गाठवले व तिंचा हात धरून तिला म्हणाला की,”माझे सोबत चल,असे म्हणून सम्बधित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह वर्तन केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तळेगाव मळे येथील रहिवासी फिर्यादी महिला (वय-४५) हि आपल्या कुटूंबासमवेत त्याच गावात रहाते.त्या कुटुंबाची एकत्रित शेती असून सदर शेतात विहीर आहे.घरातील कर्ती मंडळी बाहेर असल्याने तिला विहिरीवरील विद्युत पंप बंद करण्याचे तिला सांगितले होते.
ती दि.१८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपले नियोजित काम करण्यास गेली असता तिच्या पाळतीवर असलेला त्याच गावातील व तिच्याच आडनावाचे साधर्म्य असलेला आरोपी याने तिला गाठवले व तिंचा हात धरून तिला म्हणाला की,”माझे सोबत चल,असे म्हणून सम्बधित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह वर्तन केले आहे.

सदर महिलेने घाबरून जाऊन आरडाओरडा केला असता सदर आरोपीने जाताना तिला म्हणाला की,”कोणाला काही एक सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन” असा दम दिला आहे.

या प्रकरणी सदर महिलेने हि बाब आपल्या घरच्या नातेवाईकांना सांगितली त्यांनी ती गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच,माजी पोलीस पाटील यांनी काही प्रतिष्टीत नागरिकांच्या कानावर घातली असता त्यांनी गावातच प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असता समोरून काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे काल दि.२० मे रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक व पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१८०/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close