नगर जिल्हा
अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी इसमाने आईच्या नावे असलेल्या जमिनीत न जाण्यासाठी न्यायालयाचा मनाई हुकूम आणल्याचा राग मनात धरून आरोपी शिरीष पोपटराव डुबे रा.गोकुळनगरी कोपरगाव याने आपल्या ताब्यातील मारुती वॅग्नर गाडी (क्रमांक-एम.एच.४२ एच.३१७७) अंगावर घालून डोक्यात घालून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्यादी कैलास शामराव डुबे (वय-५८) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने देर्डे-कोर्हाळे परिसरात खळबळ उडाली आहे.
देर्डे-कोऱ्हाळे येथील फिर्यादी कैलास दुबे हे आपल्या शेताकडून घराकडे येत असताना आरोपी शिरीष डुबे हा शेताकडे आपल्या वरील क्रमांकाच्या मारुती वॅग्नर या गाडीने जात असताना त्याने फिर्यादी कैलास डुबे यांच्या दुचाकीस अंगावर घालून धडक दिली व त्यानंतर खाली उतरून डोक्यात दगड मारल्याने ते गंभिर जखमी झाले आहे.ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी कैलास डुबे यांची वडिलोपार्जित जमीन आहे.आरोपी व त्यांच्या कुटुंबात जमीन बाबीवरून भांडण आहे.यांची काही जमीन समृद्धी महामार्गात गेली असून त्यातील वाटपावरून हा वाद निर्माण झाल्याचे मानले जाते.त्यांचा कोपरगाव न्यायालयात याच वाटपावरून वाद सुरु असून त्यात न्यायालयाने, “आरोपीने आईच्या शेतात जाऊ नये”असा आदेश दिलेला आहे.याचा आरोपी शिरीष डुबे यास राग आहे.त्यातून फिर्यादी कैलास दुबे हे आपल्या शेताकडून घराकडे येत असताना आरोपी शिरीष डुबे हा शेताकडे आपल्या वरील क्रमांकाच्या मारुती वॅग्नर या गाडीने जात असताना त्याने फिर्यादी कैलास डुबे यांच्या दुचाकीस अंगावर घालून धडक दिली व त्यानंतर खाली उतरून डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.त्यानंतर फिर्यादी कैलास डुबे यांनी आरोपी शिरीष डुबे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.न.८९/२०२० भा.द.वि.कलम ३०७,३३७ अन्वये आरोपी शिरीष डुबे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.