कोपरगाव तालुका
कोपरगावात कब्रस्थान,ईदगाह विकासासाठी..इतक्या कोटीचा निधी-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कब्रस्थान व ईदगाह विकासासाठी मुस्लिम बांधवांची अनेक दिवसापासून मागणी होती.त्याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच ०१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
“कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील वर्षात कोणत्याही प्रकारचा निधी ग्रामीण भागातील कब्रस्थान व ईदगाह मैदानांना निधी मिळाला नव्हता.त्यामुळे कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या अडचणी वाढल्या होत्या. यामध्ये संरक्षक भिंत नसल्यामुळे कब्रस्थानमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव सुरु होता.या समस्यांची दखल घेवून हा निधी मिळविला आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक कब्रस्थान व ईदगाह मैदानांना संरक्षक भिंत नव्हत्या.माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरेगाव,चासनळी,धामोरी आणि चांदेकसारे या गावातील कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी दिला होता.परंतु मागील वर्षात कोणत्याही प्रकारचा निधी ग्रामीण भागातील कब्रस्थान व ईदगाह मैदानांना निधी मिळाला नव्हता.त्यामुळे कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या अडचणी वाढल्या होत्या. यामध्ये संरक्षक भिंत नसल्यामुळे कब्रस्थानमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव सुरु होता.या समस्यांची दखल घेवून हा निधी मिळविला आहे.
यामध्ये धामोरी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख),माहेगाव देशमुख येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख),करंजी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख),वाकडी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), वेस येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), पुणतांबा येथील ईदगाह मैदान पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लाख),कोकमठाण येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), सुरेगाव येथील कब्रस्थान मंडपस्थळाचे कॉंक्रीटीकरण करणे (१०लाख) व सुरेगाव येथील अल्पसंख्याक वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरण करणे (१० लाख) आदी कामांचा समावेश आहे.मुस्लीम बांधवांच्या अनेक वर्षापासूनचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मतदार संघातील मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.