जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी नगरसेवक गणेश आढाव यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानाजीक असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किसनराव रंगनाथ आढाव (वय-८५) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.ते कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश आढाव यांचे पिताश्री होते.त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मोठा जनसमुदाय होता.

स्व.किसनराव आढाव यांनी दहा वर्ष संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद तर अमृतसंजीवनी शुगरकेंन ट्रान्स्पोर्टचे १८ वर्ष उपाध्यक्षपद, एम.पी सोसायटीचे व्यवस्थापक पद, १९७२ साली तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,शिवाजीरोड तरुण मंडळाचे संस्थापक आदी पदे भूषवली होती.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी म्हणून गणले जात.त्यांच्यावर कोपरगाव पालिकेच्या अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,गोदावरी दुधसंघाचे अध्यक्ष राजेश परजणे, अशोकराव दंडवते,संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, दत्तात्रय कोल्हे,आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांनी मरणोप्रांत नेत्रदानाचा संकल्प केला होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला आहे,त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close