कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात शिवछत्रपती महाराजांची ३८९ वी जयंती तिथीनुसार नुकतीच मोठय़ा उत्साहात कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे. शहरातील बाळासाहेब ठाकरे कमान ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून राजेंद्र झावरे,मंगेश पाटील ,चैताली काळे यांनी अभिवादन केले आहे.
शिव जयंतीच्या दिवशी पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विधिवत पूजा करून आचार्यांच्या मंत्र घोषात एकवीस जोडप्यानी महामस्तकाभिषेक करण्यात आला व ५१ तोफांची सलामी देण्यात आली.तसेच जयंतीच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवनेरी गडावरून आणलेल्या ज्योतीचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले.जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सव कमिटी कडून दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा सुर्यरथ हा शहरातील बाळासाहेब ठाकरे कमानी शेजारील राजमाता जिजाऊ प्रवेशद्वारातून निघालेल्या मिरवणुकीत हत्ती गणपतीचे महिलांचे ढोल पथक तसेच सुर्यरथावर शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारलेले चेतन होडे हे मिरवणुकीतील आकर्षण ठरले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गणेश पेडमकर मुंबई यांची बॉडी बिल्डिंग स्टेज शो,विरासत ए खालसा गदका कोपरगाव या ग्रुपने मर्दानी खेळ सादर केले.सांस्कृतिक गणेश वंदना पुणे डान्स ग्रुप च्या वतीने सादर केले.सर्वोदय सेवा संस्था कोल्हापुर यांनी हलगी या वाद्यावर दान पट्टा, तलवार बाजी,काठी, मर्दानी खेळ, दारू गोळा, अगिन गोळा तर शाओलिन ग्रुप कोपरगांव यांनी मर्दानी खेळ, सटाना येथील ग्रुप ने संबळ ह्या पारंपरिक वाद्यावर आदिवासी नृत्य सादर केले.ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालय येवला शाखेच्या वतीने मल्लखांब अंग मेहनतीचे प्रत्यक्षीके सादर करण्यात आले.तानाजी थीम शंकरा रे शंकरा ह्या गाण्यावर संत ज्ञानेश्वर स्कूलने नृत्य सादर केले. माय भवानी,पिंगा ग पोरी पिंगा यावर गाण्यावर पुणे डान्स ग्रुप यानी नृत्य केले.तसेच कुमारी राजश्री होणे हिने शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केले व आजच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार करनाऱ्यांचा निषेध असे सांस्कृतिक कार्यक्रम कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश कहांडळ यांनी केले.या कार्यक्रमाला माजी आमदार अशोक काळे यांनी विशेष उपस्थिती लावली.यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटिल,चैताली काळे,अस्लम शेख, प्रफुल्ल शिंगाडे,एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,पालिकेचे माजी गटनेते अजय गर्जे, उपशहरप्रमुख कलविंदर डडीयाल,मुन्ना मंन्सुरी,मकरंद जोशी,बाळासाहेब साळुंके, लक्ष्मण मंजुळ,विशाल झावरे, वसीम शेख, सनी डहांके,विक्रांत झावरे, विकास शर्मा, योगेश मोरे,आकाश कानडे,वाल्मिक चिने, दीपक मरसाळे,पापा तांबोळी, किरण शिंदे,उमावती वहाडने, नगरसेविका सपना मोरे,वर्षा शिंगाडे,राखी विसपुते,विमल पुंडे, सारिका कुहिरे, आश्विनी होने, अक्षिता आमले,दीपाली आरगडे,समीर शेख,आकाश वाकचौरे,आकाश ननवरे,आविनाश वाघ,गगन हाडा,किरण खर्डे,संजय वाणी,गोपाळ वैरागळ, बबलू गाडे,निशांत झावरे, बाळा देवकर, मयूर दळवी,भूषण पाटणकर,मयूर खैरनार, भूषण वडांगळे, प्रवीण देशमुख,श्रीपाद भसाळे,अंकुश आढाव,दिलीप आरगडे,अनिकेत साळवी,सोनू पथक,प्रेम जपे,मंगेश देशमुख,विजय शिंदे आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक नागरिक,महिला उपस्थित होत्या.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.