कोपरगाव तालुका
कोपरगाव बस स्थानकासमोर तरुणांची नाहक गर्दी,व्यापाऱ्यांचा आक्षेप!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बस स्थानक व व्यापारी संकुल यांच्या मधील मोकळा भाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा गैरवापर अनेक तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू असून या ठिकाणी व्यापारी आस्थापनासमोर काही असामाजिक तत्व विनाकारण गर्दी करत असल्याने त्या आस्थापणात जाण्यास महिलां व तरुणींची कुचंबना होत असून व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपली गस्त वाढवून या घोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधिकडे केली आहे.
संकल्पित छायाचित्र
या खेरीज कोपरगावात डॉ.आंबेडकर मैदानात तर ग्राहकांची वहाने असतात पण त्या मोकळ्या जागेत काही तरुणांनी मुंबई,नाशिक,ठाणे आदी ठिकाणाहून चार चाकी वहाने आणून ती विक्री करण्याचा व्यवसाय जोपासला असून त्या ठिकाणी ग्राहकांची वहाने कमी व या व्यापाऱ्यांची व दलालांची वहानेच जास्त असा अनास्था प्रसंग गुदरला आहे.
कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकर मैदान व राज्य परिवहन विभागाचे कोपरगाव बस आगार हा शहराचा मध्यवर्ती भाग बनला असून या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या उभ्या रहाणाऱ्या वाहनांचा वाहनतळ म्हणून गणला जातो.या ठिकाणी अशी वहाने उभी करू नये या साठी उच्च न्यायालयाचा आदेश फलकही स्पष्ट दिसून येत आहे.तरीही या ठिकाणी वहाने मोठ्या प्रमाणावर उभी असताना दिसतात.
या खेरीज बस स्थानका समोर एक पेट्रोल पंपाच्या जागी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे.त्या ठिकाणी व्यापारी आस्थापना मोठ्या प्रमाणावर आहे.त्या ठिकाणी खरेदीसाठी महिलांची गर्दी असते.दरम्यान याच व्यापारी संकुलाच्या बाहेरील मोठ्या जागेत अवैध चहाच्या टपऱ्या व तत्सम दुकाने दिसून येतात.त्या ठिकाणी ग्राहकांपेक्षा अन्य टवाळखोर तरुणांची मोठी गर्दी सकाळ-संध्याकाळ दिसून येत असून तेच या जागेची समस्या बनले आहे.त्यामुळे समोरील व्यापारी आस्थापणात जाणाऱ्या महिला व मुली तरुणींची मोठी कुचंबना होताना दिसून येत आहे.परिणामस्वरूप या दुकानांत त्यांना त्या ठिकाणाहून जाणे मोठे अवघड बनते असा या तक्रारींचा सूर असून त्यास अनेकांनी दुजोरा दिला आहे.
या खेरीज डॉ.आंबेडकर मैदानात तर ग्राहकांची वहाने असतात पण त्या मोकळ्या जागेत काही तरुणांनी मुंबई,नाशिक,ठाणे आदी ठिकाणाहून चार चाकी वहाने आणून ती विक्री करण्याचा व्यवसाय जोपासला असून त्या ठिकाणी ग्राहकांची वहाने कमी व या व्यापाऱ्यांची व दलालांची वहानेच जास्त असा अनास्था प्रसंग गुदरला आहे.
त्यामुळे या अनधिकृत व्यावसायीक व रिकामटेकड्या तरुणांचा कोपरगाव शहर पोलिसांनी व कोपरगाव नगरपरिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील व्यापाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय उदीम वाढण्यास मदत होईल व गुंतवणुकीवर चार पैसे मिळण्याचा मार्ग सुकर होईल असा आशावादही या व्यापाऱ्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.