कोपरगाव तालुका
नगराध्यक्ष विजय वहाडणे सोडणार पदभार ?
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान अध्यक्ष विजय वहाडणे हे काही अज्ञात कारणांनी आपल्या पदाचा भार सोडणार असल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांनी दिल्याने कोपरगाव शहराच्या राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.त्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
प्रस्थापितांनी आगामी काळात व्यासपीठावर आमचा चांगल्या कामासाठी अध्यक्ष विजय वहाडणे यांनाच पाठिंबा आहे.असे म्हणायचे व वास्तवात मात्र प्रशासकीय पातळीवर त्यांची गळचेपी करण्याची एकही संधी सोडायची नाही अशी भूमिका घेतल्याचे वारंवार स्पष्ट झाल्या शिवाय राहिले नाही.त्यातून मग नगरपरिषदेच्या महिला मुख्याधिकारी यांना हाताशी धरून ईशान्य गडावरून आदेश देऊन कुठलीही कार्यवाही होणार नाही.अशी यंत्रणा राबवली गेली.त्यातून पहिले दीड वर्ष वाया घालवले.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न होऊन त्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तत्कालीन नरेंद्र मोदी विचार मंचचे उमेदवार विजय वहाडणे हे जवळपास एकोणाविस हजार मतांनी विजयी होऊन त्यात प्रस्थापित आजी-माजी आ.काळे,कोल्हे या मातब्बर नेत्यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते.दरम्यान या निवडणुकीत २८ जागांपैकी तत्कालीन आ. कोल्हे यांचे १२ शिवसेना ८ असे युतीचे २० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक विजयी झाले होते ते एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. त्यावेळी राज्यात भाजप सरकार होते.त्यामुळे हा पराभव सत्ताधारी भाजप तथा कोल्हे गटाच्या फारच जिव्हारी लागला होता त्यांना जळी, स्थळी,काष्ठी वहाडणे दिसू लागले होते.त्यामुळे त्यांनी आगामी काळात व्यासपीठावर आमचा चांगल्या कामासाठी अध्यक्ष विजय वहाडणे यांनाच पाठिंबा आहे.असे म्हणायचे व वास्तवात मात्र प्रशासकीय पातळीवर त्यांची गळचेपी करण्याची एकही संधी सोडायची नाही अशी भूमिका घेतल्याचे वारंवार स्पष्ट झाल्या शिवाय राहिले नाही.त्यातून मग नगरपरिषदेच्या महिला मुख्याधिकारी यांना हाताशी धरून ईशान्य गडावरून आदेश देऊन कुठलीही कार्यवाही होणार नाही.अशी यंत्रणा राबवली गेली.त्यातून पहिले दीड वर्ष वाया घालवले. चालू कामांना खीळ घालण्याची एकही संधी सोडायची नाही.निधी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नेण्याचा करंटेपणा करण्यापर्यंत मजल जाऊन पोहचली.या शिवाय राज्याच्या नेतृत्वाची दिशाभूल करून राज्य पातळीवरही नाकेबंदी करून एकही काम होणार नाही याची सविस्तर यंत्रणा राबवली गेली.या मागे अर्थातच तालुक्यात तीसरी शक्ती पुन्हा वर डोके काढू नये यासाठी व तिचा उपसर्ग आपल्या प्रस्थापित सत्तेला होऊ नये याची खबरदारी घेतली गेली व “बॅट”चे बटन दाबणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे उट्टे काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची बाब लपून राहिली नाही.
अध्यक्ष वहाडणे यांनी पालिकेत भ्रष्टाचार किमान पातळीवर आणून ठेकेदारीत रमलेल्या सत्ताधाऱ्यांच्या “पित्त्यांना” चांगल्या पैकी वेसण घातली गेली आहे.त्यामुळे पालिकेत असणारी अधिकाऱ्यांभोवतीचे कोंडाळे कायमचे निकाली निघाले असून सामान्य नागरिक आता थेट अध्यक्षांना भेटून अवघ्या काही मिनिटात आपले कामाचा निपटारा करू शकतो.पालिकेत कमी असलेला अधिकारी व कर्मचारी वर्गही आणण्यात त्यांना मोठे यश आले असून स्वच्छता अभियानात पालिकेला देशपातळीवर भरारी घेता आली हे त्याचे उत्तम उदाहरण मानले पाहिजे.शहर स्वच्छतेच्या पातळीवर हि मोठे काम झाले असून पाणी पुरवठा स्थिरस्थावर होण्यात शहराला मोठी मदत मिळाली आहे.साठवण तलावातील पाणी चोरीला आळा घातला गेला आहे.या पूर्वी हे धाडस कोणीही दाखवले नाही हे विशेष !
वर्तमान स्थितीत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून “या दिवट्याना” सत्ताधारी भाजपकडून राजकीय अभय पुरवले जात असून त्यांना पदांच्या सुभेदाऱ्या देऊन त्यांना न्यायालयात जाण्यासाठी रसद पुरवली गेली हि बाबही लपून राहिली नाही.शहर पोलिसानी हद्दपार केलेल्या घटकांना राजकीय अभय देऊन बिदागी,तंगतोबारा पुरवून, देऊन जेवढा काही त्रास देता येईल तेवढा देण्याचे पातक आजही सुरु असल्याने अध्यक्ष वहाडणे अस्वस्थ झाल्याचे मानले जात आहे.त्यातून अध्यक्ष वहाडणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न मोठ्या नेटाने सुरु आहे.ते काही जरी असले तरी वहाडणे यांनी पालिकेत भ्रष्टाचार किमान पातळीवर आणून ठेकेदारीत रमलेल्या सत्ताधाऱ्यांच्या “पित्त्यांना” चांगल्या पैकी वेसण घातली गेली आहे.त्यामुळे पालिकेत असणारी अधिकाऱ्यांभोवतीचे कोंडाळे कायमचे निकाली निघाले असून सामान्य नागरिक आता थेट अध्यक्षांना भेटून अवघ्या काही मिनिटात आपले कामाचा निपटारा करू शकतो.पालिकेत कमी असलेला अधिकारी व कर्मचारी वर्गही आणण्यात त्यांना मोठे यश आले असून स्वच्छता अभियानात पालिकेला देशपातळीवर भरारी घेता आली हे त्याचे उत्तम उदाहरण मानले पाहिजे.शहर स्वच्छतेच्या पातळीवर हि मोठे काम झाले असून पाणी पुरवठा स्थिरस्थावर होण्यात शहराला मोठी मदत मिळाली आहे.साठवण तलावातील पाणी चोरीला आळा घातला गेला आहे.या पूर्वी हे धाडस कोणीही दाखवले नाही हे विशेष ! या खेरीज राजकारणाच्या कचाट्यात अडकलेला पाच क्रमांकाचा साठवण तलावाचा प्रश्नही त्यांनी नूतन आ. आशुतोष काळे यांच्या मदतीने विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लागलीच काही दिवसात मार्गी लावण्यात यश मिळवले आहे.
अशा प्राप्त परिस्थितीत अध्यक्ष वहाडणे यांनी आपला कार्यभार ठेऊन दिला तर ते कोणाकडे सोपावणार ? हा प्रश्न गंभीर आहे.कि ते थेट राजकारणातून परावृत्त होणार या बाबत स्पष्टता अद्याप झालेली नाही.एक दोन दिवसात त्यावर काही तरी खल होऊ शकतो असे मानले जात आहे.या घटनेने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे हे मात्र नक्की.