गुन्हे विषयक
कोपरगावातून तरुणी गायब,शहर पोलिसांत नोंद

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रमसाफल्य कॉलनीतील तेरा बंगले परिसरात रहिवाशी असलेल्या एकवीस वर्षीय तरुणी दि.२२ ऑक्टोबर सकाळ ६.३० वाजेपासून गायब झाल्याची तक्रार मुलीची आई ज्योती मच्छीन्द्र वाघ (वय-४०) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत दाखल केली आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दि.२२ ऑक्टोबर रोजी आपण घरात असताना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपली एकवीस वार्षिय मुलगी आपल्याला शाळेच्या कागद पत्राची झेरॉक्स काढून आणते असे सांगून राहते घरातून कोठेतरी घरातून निघून गेलेली आहे.तिचा आज पर्यंत शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
कोपरगाव तेरा बंगले परीसरात रहिवासी असलेली मुलीची आई हि ब्युटी पार्लर व्यवसायात असून त्यांनी हि तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या हरवलेल्या मुली बाबत तक्रार दाखल करताना म्हटले आहे की,”आपण श्रमसाफल्य कॉलनीत रहिवासी असून आपण आपल्या कुटुंबासमवेत राहत असून दि.२२ ऑक्टोबर रोजी आपण घरात असताना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपली एकवीस वार्षिय मुलगी आपल्याला शाळेच्या कागद पत्राची झेरॉक्स काढून आणते असे सांगून राहते घरातून कोठेतरी घरातून निघून गेलेली आहे.तिचा आज पर्यंत शोध घेऊनही ती मिळून आली नाही.तिची उंची साडे चार फूट असून अंगाने सडपातळ आहे.तिचे काळे लांबसडक केस असून शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे.अंगात लाल रंगाचा टॉप,काळ्या रंगाची लेगीन,पायात चॉकलेटी रंगाचा सॅडेल,डाव्या हाताच्या मनगटाजवळ गोंदलेले आहे सोबत मो.क्रं.७२४९६५६३०९ असा मोबाईल आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी हरवलेल्या नोंदणी पुस्तकात याबाबत नोंदणी क्रं.३७/२०२० प्रमाणे नोंद केली आहे.या बाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.