कोपरगाव तालुका
दस्ताऐवज कधीही असत्य ठरू शकत नाहीत-अॅड.शिंदे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पारंपरिक दस्तावैज कधीही खोटे ठरू शकत नसल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन कोपरगाव येथील विधीज्ञ विद्यासागर शिंदे यांनी कोपरगाव येथील महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
जनसंचार माध्यमातील सामाजिक माध्यम अधिक सशक्त व गतिमान असून ‘मोबाईल’ या नूतन माध्यमास सर्वाधिक लोकप्रियता मिळालेली आहे. महिलांनी मोबाईलचा वापर संरक्षणासाठी करावा, त्याचा अनावश्यक वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. अज्ञानातून अनेक गुन्हे होत आहेत परिणामी महिलांना विनाकारण मानसिक,शारीरिक,बौद्धिक,सामाजिक छळाला सामोरे जावे लागत असल्याने गुन्ह्यांचा दस्ताऐवज दिवसेंदिवस वाढत आहे-अड्.विद्यासागर शिंदे
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय येथे महिला अत्याचार प्रतिबंधक समितीच्या वतीने “महिला विषयक कायदे व त्यांचे हक्क “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे हे होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,”जनसंचार माध्यमातील सामाजिक माध्यम अधिक सशक्त व गतिमान असून ‘मोबाईल’ या नूतन माध्यमास सर्वाधिक लोकप्रियता मिळालेली आहे. महिलांनी मोबाईलचा वापर संरक्षणासाठी करावा, त्याचा अनावश्यक वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. अज्ञानातून अनेक गुन्हे होत आहेत परिणामी महिलांना विनाकारण मानसिक,शारीरिक,बौद्धिक,सामाजिक छळाला सामोरे जावे लागत असल्याने गुन्ह्यांचा दस्ताऐवज दिवसेंदिवस वाढत आहे.मोबाईल हे जरी आपणास वरदान वाटत असले तरी त्याच्या चुकीच्या वापरातून गंभीर सजा होऊ शकते. त्यामुळे मोबाईलचा योग्य वापर करावा असे आवाहन ही तयांनी शेवटी केले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे मार्गदर्शन करताना म्हणाले कि,” की मोबाईल अत्यावश्यक गरज झाल्याने त्याच्या वापरातून अनवधानाने काही चुका होण्याची शक्यता असते. त्याकडे लक्ष देवून नेहमी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती डॉ.पी.व्ही. रांधवने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.छाया शिंदे यांनी करून दिला, सूत्रसंचलन रिंकू प्रसाद हिने केले व आभार डॉ. संगीता दवंगे यांनी मानले. प्रा.श्रीमती दीपिका चौहान यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक वसंत पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले.