कोपरगाव तालुका
महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या किराणा दुकानदार महिलेचा संगमनेर तालुक्यातील आश्वि येथील आरोपी संतोष बंडू लकारे याने आपल्या मेहुणीला आपल्या घरासमोर उभी असताना तिला घरात चल मला तुझ्याशी बोलायचे आहे.त्याला फिर्यादी महिलेने नकार दिल्यावर तिचा डावा हात धरून तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे वारी परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी असलेली महिला आपल्या दोन मुलांसह आपल्या माहेरीच राहते.फिर्यादी महिलेची एक बहीण आश्वि येथे दिलेली आहे.त्यांच्या नवरा-बायकोत काही कारणाने वाद झाल्याची माहिती मिळते.त्यातून फिर्यादी महिला घरी असताना तिचा मेहुणा घरी आला व त्याने फिर्यादी महिलेला ,”तू घरात चल मला तुझ्याशी बोलायचे आहे”.असे म्हणून तिला घरात येण्यास सांगितले असता तिने त्यास नकार दिला व म्हणाली,” तुम्हाला काय बोलायचे ते ओट्यावर बोला”.त्याचा राग येऊन फिर्यादी महिलेचा मेहुणा म्हणाला कि, “मी तुला उचलून घेऊन जातो, माझे कोणी वाकडे करणार नाही”असे म्हणून फिर्यादी महिलेचा डावा हात धरून तिला जवळ ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संतोष बंडू लकारे याचे विरुद्ध गु.र.नं.६८/२०२० भा,द.वि.कलम ३५४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पूढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे पुढील तपास करत आहे.विशेष म्हणजे फिर्यादी महिलेने आपल्या बहिणीसोबत तालुका पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे.