कोपरगाव तालुका
भोजडे शिवारात एकास मारहाण,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत वारी ते भोजडे या रस्त्यावरील भोजडे शिवारात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर पाणी कमी मारल्याचा कारणावरून आरोपी संजय रंगनाथ सिनगर, विजय रंगनाथ सिनगर, विजय रंगनाथ सिनगर यांचा मुलगा (नाव माहित नाही ) यांनी फिर्यादी अरुण विजय काजळे (वय-४०) रा.कान्हेगाव यांना लोखंडी गज फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वर्तमानस्थितीत कोपरगाव तालुक्यात मुंबई-नागपूर या ५६ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.त्या साठी स्थानिक मजूर,तसेच यंत्र सामुग्री वापरण्यात येत असून.या रस्त्यावर जी माती,मुरूम टाकला जात आहे.त्यावर पाणी मारण्याचे काम आरोपींकडे असल्याचे समजते.त्याच कामाजवळ कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी अरुण काजळे यांची वस्ती आहे.त्या कामावर रूळ फिरवताना पाणी मारणे आवश्यक आहे.मात्र पाणी न मारल्यास त्याची धूळ उठून त्या धुळीचा नजीकच्या रहिवाशांना त्रास होत असतो.मात्र १ मार्च या दिवशी काम सुरु असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास या बाबत फिर्यादी अरुण काजळे यांनी तक्रार केल्याचा राग येऊन आरोपी संजय सिनगर,विजय सिनगर,विजय सिनगर यांचा मुलगा यांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने फिर्यादिस मारहाण केली त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन आरोपीं विरुध्द गु.र.नं.६४/२०२० भा.द.वि.कलम-३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.