निधन वार्ता
गंगुबाई आगवन यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील करंजी येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब आगवन यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई सखाहरी आगवन यांचे नुकतेच निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.त्यांच्यावर करंजी येथे स्मशानभूमीत शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कै.श्रीमती गंगुबाई या प्रगतशील शेतकरी नानासाहेब आगवन यांच्या मातोश्री तर युवक कार्यकर्ते देवीदास आगवन यांच्या आजी होत्या.येसगांव येथील दगडू पा.दरेकर यांच्या परिवारातील त्या भगिनी होत्या.धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे त्या करंजी पंचक्रोशीत परिचित होत्या.अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यांनी मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.कुटुंबावर चांगले संस्कार केले.
दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीच्या वेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात चार मुले,सहा मुली,सुना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.