जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगांवात पेन्शनर्स ओसाेशिएशनची बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगांव तालुका पेन्शनर्स ओसाेशिएशनची बैठक भागवत गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली आहे.या बैठकीत श्री जगन्नाथ परशराम काळे यांची जिल्हा पेन्शनर्स असोशिएशन उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.त्यांच्यानिवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“सन-२०१८ पासुन सेवानिवृत्त शिक्षक तसेच प्रोव्हीडंड फंड ग्रॅज्युएटी पेन्शन विक्री थकीत रकमा मिळाल्या नाहीत.प्रत्येक माहिन्याची पेन्शन ५ तारखे पर्यन्त व्हावी.२५ टक्के पगार थकीत महागाई पेन्शन विक्री बंद करणेसह अनेक प्रश्नांवर लवकरच कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास आधिकारी,गटशिक्षण आधिकारी यांचे बरोबर चर्चा करूण दिशा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”-दिलीप ढेपले,कोपरगाव पेन्शनर संघटना कोपरगाव.

त्यांचा सत्कार गोपिचंद इंगळे,दिलीप ढेपले यांचे हस्ते तालुका पेन्शनर्स असोशिएशन सभेत संघटने मार्फत करण्यात आला आहे.संघटनेचे अध्यक्ष गोपिचंद इंगळे यांचा सत्कार भागवत गुरुजी यांचे हस्ते करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी पेन्शनर्स च्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.७ वा वेतन आयोग २ रा हप्ता शिक्षण वि भागातून आज पर्यन्त मिळाला नाही.सन-२०१८ पासुन सेवानिवृत्त शिक्षक तसेच प्रोव्हीडंड फंड ग्रॅज्युएटी पेन्शन विक्री थकीत रकमा मिळाल्या नाहीत.प्रत्येक माहिन्याची पेन्शन ५ तारखे पर्यन्त व्हावी.२५ टक्के पगार थकीत महागाई पेन्शन विक्री बंद करणेसह अनेक प्रश्नांवर लवकरच कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास आधिकारी,गटशिक्षण आधिकारी यांचे बरोबर चर्चा करूण दिशा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिलीप ढेपले,गोपिचंद इंगळे,ज.प.काळे,अरूण धुमाळ,माजी केंद्रप्रमुख श्री ठोंबरे आदींनी दिली आहे.

सदर प्रसंगी श्री गांगवे,श्री शिरसाठ व अनेक सभासदांनी श्री काळे गुरुजी व श्री इंगळे गुरूजी आदींचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप ढेपले यांनी केले तर आभार श्री ठोबंरे यांनी मांनले आहे.या सभेला महिला प्रतिनिधी उपास्थित होत्या सभेसाठी संघटनेचे बरेच सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close