जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरंगावच्या जनतेला पाणी हवंय,वाद नाही-..या माजी नगराध्यक्षांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही.त्यासाठी कोण जबाबदार आहेत हा विषय अतिशय वादग्रस्त आहे.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ नयेत म्हणूनच आपण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कोपरगावसाठी दारणा व निळवंडे या दोन्ही धरणांतून असलेले पाणी आरक्षण अबाधित ठेवावे असा विषय मांडला व तसा ठरावही सर्वानुमते करण्यात आला.कारण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती असल्याने येणाऱ्या काळासाठीही पाणी साठवण क्षमता वाढविणे महत्वाचे आहे.

“नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या बहुतांश मान्यता,प्रक्रिया पूर्णत्वास गेलेल्या आहेत.लवकरच पाच नंबर साठवण तलाव झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढणारच आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंका नाही”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरातील नागरिकांना दारणा धरणातून ०३.३६ द.ल.घ.मी.पाणी साठा मंजूर झाला आहे.त्यामुळे पाण्याचा आधीच भरपूर साठा असल्याने व वितरण व्यवस्था सदोष असल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.त्यावर नुकताच काही सत्ताधारी पक्षाच्या काही माजी पदाधिकाऱ्यांना नुकताच गोदावरी कालव्यातून दूषित पाणी येत असल्याचा महाकाय साक्षात्कार होऊन पुन्हा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळवंडे धरण्याच्या पिपाण्या वाजण्यास सुरुवात झाली आहे.त्यावर काळे गटाच्या एका विरोधी गटनेत्याने त्यास हरकत घेऊन गोदावरी कालव्यांतून येणारे पाणी शुद्धच असल्याचे एका परिपत्रकान्वये विशद केले होते.त्यानंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या बहुतांश मान्यता,प्रक्रिया पूर्णत्वास गेलेल्या आहेत.लवकरच पाच नंबर साठवण तलाव झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढणारच आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंका नाही.निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास गेल्यानंतर मिळणारे पाणी साठवण करण्यासाठी साठवण क्षमता तयार असणेही गरजेचे आहे.पाणी कुठूनही आले तरी ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करूनच पाणी पुरवठा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे.याबाबत सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप यामुळे जनमत विचलित होऊ शकते याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे.पाणी कुठूनही येऊ द्या पण आम्हाला नियमित पाणी द्या हीच जनतेची अपेक्षा आहे.
म्हणूनच पाच नंबर साठवण तलाव आणि नियोजित निळवंडे पाणी योजना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.कोपरगावच्या नागरिकांचे कुठल्याही आरोप प्रत्यारोप,राजकारण यापेक्षा पाणी समस्येवर तातडीने उपाय करणे यावरच लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close