कोपरगाव तालुका
कोपरगाव शिवसेनेच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका शिवसेनेने दिनांक २५ जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेत ऑटो डिलीट झालेल्या व समितीने जाचक अटीच्या आधारे अपात्र ठरवलेल्या लाभार्थींचा पात्र यादीत समावेश करावा यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांच्या कार्यालयामार्फत नगर जिल्ह्याची प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींच्या बाबतीत उचित कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.
“जे पात्र लाभार्थी यादीत आले परंतु समितीने अदखलपात्र झाले त्यांचा सर्व्हे परत करण्यात येईल व त्या लाभार्थी वर अन्याय होणार नाही त्याकरिता स्वतः गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सह अठरा जणांची तालुका समिती पुन्हा सर्वे करणार आहे”-शिवाजी ठाकरे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका शिवसेना.
काल शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांचे सोबत सविस्तर चर्चा केली,याबाबाबत बोलताना गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आपोआप रद्द झालेल्या लाभार्थ्यांची पुर्नसर्व्हेसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्य मंत्री अब्दुल सत्तार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची आभासी बैठक पार पडली असून लवकर च शासन निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.जे पात्र लाभार्थी यादीत आले परंतु समितीने अदखलपात्र झाले त्यांचा सर्व्हे परत करण्यात येईल व त्या लाभार्थी वर अन्याय होणार नाही त्याकरिता स्वतः गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सह अठरा जणांची तालुका समिती पुन्हा सर्वे करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना गट विकास अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
घरकुल योजनेतील जाचक अटी दुरुस्त करण्याची या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,विधानसभा कार्याध्यक्ष थोरात,माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक कानडे,माजी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे, तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे,उपतालुकाप्रमुख सागर फडे,रंगनाथ गव्हाणे,बाळासाहेब मापारी आदींसह लाभार्थी बहु संख्येने उपस्थित होते.